Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू

Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. एन-६ परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून मुख्य सूत्रधार गट्ट्या रोमियोचा शोध सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 14, 2026 | 02:47 PM
आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा (Photo Credit - X)

आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा
  • सिडको परिसरातून दोघांना अटक
  • ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या रॅकेटवर सिडको पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी दि.१२ मे रोजी सायंकाळी कारवाई केली. एन-६ येथील संभाजी कॉलनी परिसरातून दोन तरुणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या मोबाइलमध्ये बेटिंग वेबसाइटवरील अनेक आयडी, पासवर्ड, पैशांचे व्यवहार तसेच व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग आढळल्याने पोलिसांनी डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. नयन राजेंद्र केवट (२५) व आकाश संजय ठोंबरे (२६, दोघे रा. संभाजी कॉलनी, एन-६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

सिडको पोलिस स्टेशनच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, हनुमान मंदिराजवळ दोन जण आयपीएलमधील एसआरएच आणि गुजरात संघातील सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेत आहेत. त्यानुसार सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सायंकाळी छापा टाकला. पोलिसांनी नयन केवट व आकाश ठोंबरे या दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान नयनकडून एक मोबाइल, तर आकाशकडून अॅपल आयफोन जप्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड झाले व्यवहार

पोलिसांनी मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट तपासले असता क्रिकेट बेटिंग, पैशांचे देणे-घेणे, आयडीची देवाणघेवाण आणि हार-जीतच्या रकमांचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले. डिजिटल पुरावे जप्त करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

मोबाईलमध्येच सट्टयाचा ‘बुक’, इतरांकडून बेटिंग स्वीकारल्या

दोन्ही मोबाइलची तपासणी केली असता ’20Wicket.com’ आणि ‘CRICBET99’ या वेबसाइटवर बेटिंग अकाउंट सुरू असल्याचे समोर आले. तपासात नयन केवटच्या मोबाइलमध्ये १३, तर आकाश ठोंबरेच्या मोबाइलमध्ये ८ बेटिंग आयडी आढळले. काही आयडीवर पैसे शिल्लक असल्याचेही समोर आले, आरोपी हे आयडी वापरून इतरांकडून बेटिंग स्वीकारत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

गट्टया रोमियो आता रडारवर

चौकशीत आरोपींनी शुभम वेताळ उर्फ गट्टया रोमियो याच्याकडून बेटिंग आयडी घेतल्याची कबुली दिली. तो इतरांना आयडी विकून आर्थिक व्यवहार करत असल्याचेही समोर आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नयन केवट, आकाश ठोंबरे आणि शुभम वेताळ उर्फ गड्या रोमियो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शिवाजी भोसले करीत आहेत.

Kalyan Crime: कल्याण हादरलं! लुडोच्या वादातून अल्पवयीन मामानेच भाच्याची केली हत्या; आरोपी अटकेत

Web Title: Chhatrapati sambhajinagar ipl betting racket exposed two arrested cidco police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
2

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
4

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.