Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Chhatrapati Sambhajinagar: इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका 35 वर्षीय विवाहितेसाठी धोकादायक ठरली. आरोपीने चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे अपहरण केले. तिला 24 तासांहून अधिक काळ डांबून ठेवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला नेवासातून अटक करून न्यायालयात हजर केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 25, 2026 | 02:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा घेत विवाहितेचे अपहरण करून वारंवार अत्याचार.
  • चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केले.
  • बेगमपुरा पोलिसांनी आरोपीला नेवासातून अटक करून पोलिस कोठडी मिळवली.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीसोबत एका महिलेने मैत्री केली. याच मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिचे अपहरण केले. तिला २४ तास डांबून ठेवून वारंवार तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर पुन्हा भेटली नाही किंवा पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपीचं नाव राजू मसू माळी असे आहे. पोलिसांनी त्याला नेवासा येथून अटक केली आहे. पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील आहेत. ते उसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने विवाहित पीडित महिलेला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. पीडित आणि तिचा पती गंगापूर येथे ऊसतोडीसाठी गेले असतांना आरोपीही तेथे पोहोचला. त्यांनतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरु होता.

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

धमकी देत एका शेडमध्ये नेले

१४ जुलै रोजी पीडित महिला तिच्या मावसभावाला भेटण्यासाठी बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आली होती. चार वाजताचया सुमारास बहीण घरी गेल्यानंतर ती भावासोबत रुग्णालयात थांबली. ही माहिती आरोपीला कळताच तो तिला रुग्णालयात भेटण्यासाठी आला. रुग्णालयातून पाणी आणण्यासाठी खाली गेल्यानंतर आरोपीने तिला अडवले. माझ्यासोबत आली नाहीस तर आपले चॅट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. अशी धमकी त्याने दिली. भीतीपोटी महिला त्याच्या दुचाकीवर बसली. त्यांनतर आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि शहरापासून दूर असलेल्या एका भागातील पत्र्याच्या शेडमध्ये जबरदस्तीने नेले.

२४ तास ओलीस ठेवत

आरोपीने तिथे तिला २४ तास ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. १६ जुलै रोजी तो तिला नेवासा परिसरातील दुसर्या एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. तिथे दिवसभर तिला डांबून ठेवत रात्री पुन्हा अत्याचार केले. १७ जुलै रोजी पीडितेने मुलांची आठवण येत आहे असे सांगितले आणि मला सोडून देण्याची विनंती केली. त्यांनतर आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवले. मात्र पोलिसांकडे तक्रार केली किंवा पुन्हा माझ्याकडे आली नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला.

आरोपी अटकेत

गावी पोहोचल्यानंतर घाबरलेल्या महिलेने संपूर्ण घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितले. पतीने आणि पीडित महिलेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेतला आणि त्याला नेवासा येथून अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने पीडित महिलेला कशाच्या आधारे धमकावले?

    Ans: इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन.

  • Que: पीडितेला किती काळ डांबून ठेवण्यात आले?

    Ans: सुमारे 24 तासांहून अधिक काळ.

  • Que: आरोपीला पोलिसांनी कुठून अटक केली?

    Ans: नेवासा येथून.

Web Title: Chhatrapati sambhajinagar married woman kidnapped and held for 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
1

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…
2

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
3

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
4

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.