Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध, जुने वाद आणि विशेषतः अमली पदार्थांच्या वाढत्या नशेतून घडणाऱ्या या सलग गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 06, 2025 | 04:57 PM
छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले (Photo Credit - X)

छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगर हादरलं!
  • महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले
  • पोलिसांचा वचक संपला?

अंकुश थोरात । नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या एका महिन्यात शहरात तीन खून आणि डझनभर चाकूहल्ल्यांच्या भयावह घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची मोठी भीती पसरली आहे. प्रेमसंबंध, जुने वाद आणि विशेषतः अमली पदार्थांच्या वाढत्या नशेतून घडणाऱ्या या सलग गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शहरातील चित्र चिंताजनक

शहरातून आता पोलिसांचा वचक संपल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एकीकडे पोलीस अमली पदार्थांवर कारवाईचे ढोल बडवतात, तर दुसरीकडे याच नशेतून तरुण चाकूहल्ले, चोरी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांकडे वळत आहेत. पोलिसांच्या कारवाईतील सुस्तपणा आणि गुन्हेगारांचे वाढलेले बळ, हे शहरातील चित्र चिंताजनक बनले आहे.

किरकोळ वादातून मित्राची हत्या

१४ ऑक्टोबर रोजी जवाहरनगर परिसरातील एसएफएस मैदानावर एका किरकोळ घटनेने शहराला हादरवून सोडले. मैत्रिणीवरून झालेल्या वादातून, बालपणापासूनचा जिवलग मित्रच शत्रू ठरला. सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (२४) याने मित्र सुरेश उंबरकर याचा गळा धारदार शस्त्राने चिरून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली, तरी असे वाद आधीच का थांबवले नाहीत, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Delhi Crime: दिल्लीतील ‘Money Heist’ गँगकडून 150 कोटींची सायबर फसवणूक; ‘प्रोफेसर’सह तिघे अटकेत

भाजी विक्रेत्याचा फिल्मी स्टाईलने खून

३१ ऑक्टोबरला घेलीपुरा परिसरात समीर खान इनायत खान ऊर्फ मालेगाव (३०) या भाजी विक्रेत्याची जुन्या वैरातून हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने वार करून आरोपींनी त्याचा जीव घेतला. घटनेनंतर आरोपी फरार झाले, त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र एक आरोपी अजूनही पसार आहे. घटनेच्या रात्री परिसरात पोलीस गस्त नसल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने क्रूर हत्या

३ नोव्हेंबर रोजी काबरानगर भागात झालेल्या घटनेत सुधाकर शेषराव ढेपे (४८) याने प्रेयसीच्या उपस्थितीत विशाल बंडू पाचकोर (३२) याचा लाकडी दांड्याने ठार मारले. हत्या लपवण्यासाठी मृतदेह नाल्याजवळ फेकून देण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा गुन्हा उघडकीस आला. मात्र, ही घटना पोलिसांच्या गस्तीतील आणि प्रतिबंधात्मक उपायांमधील ढिलाईची स्पष्ट साक्ष ठरली आहे.

नशा आणि अमली पदार्थांच्या सेवनाने गुन्हेगारीला बळ

शहरात गेल्या काही महिन्यांपासून चाकूहल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. किरकोळ वाद, पैशांचे व्यवहार किंवा प्रेमसंबंध, कोणतेही कारण असो, युवक थेट शस्त्र वापराकडे वळताना दिसत आहेत. या सर्व घटनांमागे नशा आणि अमली पदार्थांचे वाढते सेवन हा समान धागा आहे. पोलीस अधूनमधून अमली पदार्थविरोधी मोहीम राबवून कारवाईचे प्रदर्शन करत असले तरी, वस्तुस्थिती अशी आहे की, शहराच्या अनेक भागांमध्ये अमली पदार्थांची तस्करी सर्रास सुरू आहे.

धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

Web Title: Chhatrapati sambhajinagar shaken 3 murders dozens of knife attacks in a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • police

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शहरात ई-बसची प्रतीक्षा वाढली! ओलेक्ट्रा कंपनीशी संपर्क तुटल्याने ३५ एसी बस प्रकल्पाला मोठा विलंब
1

Chhatrapati Sambhajinagar: शहरात ई-बसची प्रतीक्षा वाढली! ओलेक्ट्रा कंपनीशी संपर्क तुटल्याने ३५ एसी बस प्रकल्पाला मोठा विलंब

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन
2

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…
3

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
4

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.