
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगर: एका इंजिनीअर तरुणीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत मायदेश गाठला. हे कृत्य कंपनीच्या मालकाने केले आहे. आरोपीचे नाव रामभाऊ उढाण असे आहे.
नेमकं काय प्रकरण?
पीडित तक्रारदार तरुणी ही इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. २०२१ मध्ये शहरातील लेडीज हॉस्टेलमध्ये ती राहत होती. तेव्हा तिने अॅग्रो केअर मशिनरीज या कंपनीत काम केले. त्यानंतर २०२५ मध्ये ती उल्कानगरी रोडवरील शंकर रेसिडेंसी येथील एफ व्होल्ट या कंपनीत नोकरीला लागली. तेथे काम करत असताना कंपनी मालक अविनाश रामभाऊ उढाण सोबत ओळख झाली. तेव्हा त्याने थायलंड येथे मार्केटिंग मॅनेजरची नोकरी असल्याचे तिला सांगितले.
या जॉबकरीता त्याने तिच्याकडून रोख दीड लाख रुपये घेतले. यानंतर जॉब कन्फर्म झाल्याचे तिला सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उढाणने तिला थायलंड येथे जाण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेऊन सोडले. तेथून ती बँकॉकला पोहोचली. तेथे हरप्रीत सिंग हा तिला घेण्यासाठी आला आणि त्याने तिला कम्पोट गाती (कम्बोडिया) टॅक्सीने क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीत नेऊन सोडले.
या कंपनीत तिच्याकडून स्कॅमिंगचे काम करून घेतले जात होते. उढाणने आपल्याला स्कॅमिंग काम करण्यासाठीच थायलंडला विक्री केल्याची तिची खात्री झाली. यानंतर दोन महिन्यांनी संबंधित कंपनीला 2 हजार अमेरिकन डॉलर भरून सुटका करून घेतली आहे. अविनाश याने तिला स्कॅमिंग कामाची पूर्व कल्पना न देता फसवणूक केली. तसेच बेकायदेशीर कामासाठी थायलंड व पुढे कम्बोडिया येथे पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कम्बोडिया येथील भारतीय दूतावासाच्या मदतीने 21 ऑक्टोबर रोजी ती मुंबईला परतली.
संभाजीनगर हादरलं! किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून, २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आल्या आहे. शुभम रणवीर सिंह राजपुत असे मृत तरुणाचे नाव आहे. गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पोरं गोळा करत तरुणाला धारधार शास्त्राने हल्ला करत संपवले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. ही घटना संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री सडे आठच्या सुमारास घडली आहे.