Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

चित्रकूटच्या देवांगना घाटीतील जंगलात रील बनवण्यासाठी गेलेल्या NEET विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चार दिवसांत मोठा तपास पूर्ण केला. 374 सीसीटीव्ही, 6 हजार मोबाईल नंबर आणि 58 संशयितांची चौकशी करत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. मुख्य आरोपीला चकमकीदरम्यान गोळी लागल्यानंतर ताब्यात घेण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 01:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रील शूटसाठी गेलेल्या NEET विद्यार्थिनीवर देवांगना घाटीत तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • पोलिसांनी 374 सीसीटीव्ही फुटेज, 6 हजार मोबाईल नंबर तपासून तिन्ही आरोपींना अटक केली.
  • मुख्य आरोपी चकमकीत जखमी झाला असून तिन्ही आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना. चित्रकुटच्या देवांगना घाटीच्या जंगलात २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा समोर आलं आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण होते. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीच्या पायात गोळी मारून त्याला अटक केली आहे. यासोबतच उर्वरित दोन्ही आरोपींना पोलिसांनी ९ तासानंतर अटक केली.

काय घडलं नेमकं?

मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असलेली पीडित मुलगी राजस्थानच्या कोटा येथे NEET परीक्षांची तयारी करते. २२ जुलै (बुधवारी) ती सुट्ट्यांमध्ये घरी आली असताना चित्रकूट येथील तिच्या १७ वर्षीय मित्राला (बॉयफ्रेंडला) भेटण्यासाठी गेली होती. दुपारी १ च्या सुमारास दोघेही दोघेही जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या देवांगना घाटीतील एका टेकडीवर बसून सोशल मीडियासाठी रील बनवत होते. तेव्हा ३ वाजताच्या सुमारास तिथे ३ तरुण एका बाईकवरून आले. त्यांनी स्वतःला वनविभागाचे कर्मचारी असल्याचे सांगितले आणि चौकशीच्या नावाखाली या जोडप्याला धमकावण्यास सुरुवात केली. तेव्हा पीडित मुलीसोबत असलेल्या मुलाने त्यांच्या असभ्य वर्तनाला विरोध केला. तेव्हा आरोपींनी त्याला पट्ट्याने अमानुष मारहाण केली. त्याचे हात-पाय गमछ्याने (रुमालाने) बांधून त्याला बाजूला टाकले. आरोपींनी मुलीला गप्प राहण्याची आणि ओरडल्यास टेकडीवरून खाली फेकून देण्याची धमकी दिली.

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या

त्यांनतर मुलीला घसीटत जवळच्या झाडीत नेऊन तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. आरोपी पळून गेल्यानंतर मुलाने स्वतःची सुटका केली आणि झाडीत अस्वस्थ पडलेल्या मुलीकडे पोहोचला. टेकडीवर नेटवर्क नसल्याने डायल-११२ ला फोन लागत नव्हता. त्यामुळे मुलाने मुलीला घेऊन टेकडीखाली धाव घेतली आणि नेटवर्क आल्यावर सायंकाळी ४:४५ वाजता पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दोघांना रुग्णालयात दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.

तिन्ही आरोपी अटकेत

पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता मडथा जंगलात झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी जितेंद्र कुमार उर्फ भोला (वय २५, रा. कल्ला गाव) याच्या पायावर गोळी लागल्याने तो जखमी झाला आणि त्याला अटक करण्यात आली. यानंतर शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी इतर दोन फरार आरोपी विवेक पटेल (रा. रयपुरवा माफी) आणि प्रवीण पटेल (रा. कल्ला गाव) यांनाही अटक केली. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या जबाबानंतर संबंधित गंभीर कलमांखाली एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने करत आहेत.

Crime News : YouTube व्हिडिओ पाहून रचला हत्येचा कट, जयपूर पोलिसांनी केला दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील चित्रकूटच्या देवांगना घाटीच्या जंगलात.

  • Que: आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी काय तपास केला?

    Ans: 374 सीसीटीव्ही फुटेज, 6 हजार मोबाईल नंबर आणि 58 संशयितांची चौकशी.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Chitrakoot crime she went to shoot a reel when they approached claiming to be forest department employees three monsters committed a horrific act against a neet student in the forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.