(फोटो सौजन्य: Pinterest)
Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या
दोन्ही मित्रांवर आपला साथीदार दिनेश याच्या मृत्यूचा आरोप होता. ते दौसाजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांना दौसा येथील भंडारेज रोडवरील एका चहाच्या टपरीवर अटक करण्यात आली. चाैकशीत असं उघड झालं की, ते तिघे श्री हॉटेल अँड रेस्टॉरंटमध्ये एका दारू पार्टीला गेले होते आणि पार्टीच्या खर्चावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातच दोन्ही मित्रांनी मिळून दिनेशचा ओढणीने गळा आवळला आणि त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ऑन केला आणि घटनास्थळावरुन गुपचूप पळ काढला. त्यांनी मृत मित्राचा मोबाईल फोन देखील आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचा सिमकार्ड फोडून फेकून दिला.
फरारीदरम्यान दौसा येथील एका हॉटेलच्या वाय-फायचा वापर करून त्यांनी यूट्यूबवर “पोलिसांपासून कसे वाचावे?”, “हत्येच्या गुन्ह्यात कशी कारवाई होते?” आणि “काय शिक्षा होऊ शकते?” अशा विषयांवर माहिती शोधल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर दोघे सीकर जिल्ह्यातील खाटूश्याम मंदिरात गेले आणि तेथे जाऊन आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढे गुजरातमध्ये पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना अमली पदार्थांचे व्यसन होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली ओढणी देखील जप्त केली आहे.






