नेमकं काय घडलं?
अमृता गरड (१९ वर्ष) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर आरोपी आईचे नाव आशा गरड असे आहे. अमृताचे घर शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. तो मुलगा दुसऱ्या जातीचा होता. हे प्रेम संबंध आईच्या नजरेस आले. तो दुसऱ्या जातीचं असल्याने आईचा याला विरोध होता. त्यामुळे घरात सतत आई आणि अमृता या दोघांमध्ये वाद होत होते. सततच्या होणाऱ्या भांडणाला कंटाळून अमृता प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. यामुळे संतापून आईने अमृताची हत्या केली. ओढणीच्या साहाय्याने तिने गळा आवळून हत्या केली.
हत्येच्यावेळी अमृताचे वडील आणि दोन भाऊ हे घरातच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात आईने मुलीची हत्या केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आईला अटक केली. या हत्येसाठी आईला घरातील सदस्यांनी मदत केली का? याचा देखील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
धडक दिली… कार मागे घेतली… आणि जखमीच्या अंगावरून पुन्हा घातली; उल्हासनगरातील घटना हादरवणारी
उल्हासनगरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हिट-अँड-रन प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. या भीषण घटनेत एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी कल्याणमधील गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Ans: प्रेमसंबंधांना आणि आंतरजातीय नात्याला विरोधामुळे.
Ans: मृत तरुणीच्या आईला.
Ans: हत्येत घरातील इतर सदस्यांचा सहभाग होता का, याचा.






