Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम

विविध बँक खात्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने एकूण २९ लाख ३३ हजार २०० रुपये घेतले. त्यापैकी केवळ ६ लाख २५ हजार २०० रुपये विकासक जी. डी. स्क्वेअर यांना देण्यात आले, तर उर्वरित २३ लाख ८ हजार रुपये आरोपीने स्वतःच्या वापरासाठी परस्पर घेतल्याचा आरोप तक्रारीत नमूद केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2026 | 03:19 PM
आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : बांधकाम प्रकल्पातील फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली 5 ग्राहकांकडून तब्बल २९ लाख ३३ हजार न २०० रुपये घेत त्यापैकी केवळ ६ लाख २५ हजार २०० रुपये विकासकाला देऊन उर्वरित २३ लाख ८ हजार रुपये परस्पर वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात सेल्स हेडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ऋषिकेश शिवाजी आहेर (वय ३०, व्यवसाय नोकरी, सध्या रा. पिंपळे निलख, पुणे, मूळ रा. नाशिक) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सारंग भारत बोरा (वय अंदाजे ३७, मूळ रा. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत पुनावळे येथील ‘१८ मॅग्निट्युड’ प्रकल्पात हा प्रकार घडला. आरोपी सारंग बोरा हा संबंधित प्रकल्पात विस्टेरिया रिअल व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सेल्स हेड म्हणून काम करत होता.

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

विकासक आणि कंपनीमध्ये सेल्स मँडेट एजंटबाबत कोणताही करारनामा झालेला नसतानाही आरोपीने फिर्यादीला प्रकल्पातील बी-१०५ क्रमांकाचा फ्लॅट बुक करण्यास सांगितले. त्यानुसार, ३० एप्रिल २०२५ ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीकडून रोख तसेच विविध बँक खात्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने एकूण २९ लाख ३३ हजार २०० रुपये घेतले. त्यापैकी केवळ ६ लाख २५ हजार २०० रुपये विकासक जी. डी. स्क्वेअर यांना देण्यात आले, तर उर्वरित २३ लाख ८ हजार रुपये आरोपीने स्वतःच्या वापरासाठी परस्पर घेतल्याचा आरोप तक्रारीत नमूद केले आहे.

चंदननगरमध्येही फसवणुकीचा प्रकार

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून विविध व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध यापूर्वी भिगवण आणि विमानतळ पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Web Title: Citizens are being scammed in the name of booking flats incident in pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Pimpri News

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.