Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून मालखेड सोसायटीत राडा; चेअरमनला मारहाणीनंतर सदस्यावर कोयत्याने वार

बाजीराव शामराव माने आणि सर्जेराव शामराव माने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अशोक विठोबा माने (वय ५८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेत अशोक माने यांच्या डाव्या हाताला कोयत्याचा वार लागून ते जखमी झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2026 | 11:44 AM
अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

Follow Us
Follow Us:

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोसायटीच्या प्रतिनिधीची निवड करण्याच्या ठरावावरून मालखेड (ता. कराड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून चेअरमनला मारहाण केल्यानंतर भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सदस्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.24) सकाळी घडली. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजीराव शामराव माने आणि सर्जेराव शामराव माने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अशोक विठोबा माने (वय ५८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेत अशोक माने यांच्या डाव्या हाताला कोयत्याचा वार लागून ते जखमी झाले असून, रणजित आनंदराव माने यांनाही मारहाणीत दुखापत झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता मालखेड सोसायटीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या प्रतिनिधीची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोसायटी सदस्य बाजीराव माने यांनी आपल्या नावाचा ठराव करण्याची मागणी केली. मात्र, इतर सदस्यांनी त्यांच्या नावाला विरोध करून हौसेराव लोकरे यांच्या नावाला पसंती दिली. यावरून बाजीराव माने यांनी बैठकीत वाद घालण्यास सुरुवात केली.

बाजीराव माने आरडाओरडा करत असल्याने सोसायटीबाहेर थांबलेला त्यांचा भाऊ सर्जेराव माने आत आला. त्याने सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय माने यांना पकडून मारहाण केली. यावेळी अशोक माने यांच्यासह इतर सदस्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

यानंतर सर्वजण सोसायटीबाहेरील रस्त्यावर चर्चा करत असताना सर्जेराव आणि बाजीराव माने हे दोघे पुन्हा तेथे आले. सर्जेराव माने याने हातातील कोयत्याने अशोक माने यांच्यावर वार केला. हा वार त्यांच्या डाव्या हातावर बसल्याने ते जखमी झाले. त्यानंतर दोघा भावांनी रणजित आनंदराव माने यांनाही मारहाण केली. या मारहाणीत रणजित माने यांच्या खांद्याला दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर ! महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

दरम्यान, हल्ल्यानंतर दोन्ही संशयितांनी हातातील कोयता घटनास्थळी टाकून तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कराड ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Web Title: Clashes in malkhed society over satara district bank election resolution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Satara District Bank Election
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
3

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
4

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.