Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; म्हणाले “पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून…”

पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2025 | 05:35 PM
Pune News: गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; म्हणाले "पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून..."

Pune News: गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; म्हणाले "पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून..."

Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उससली यह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 4, 2025

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्याच्या मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असंवेदनशीलतेचा परिचय आपल्याला पहायल मिळत आहे. ज्या प्रकारे तेथील डॉक्टर्सनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसुतीला आलेल्या महिलेला अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. अधिकचे पैसे मागितले असा हा संपूर्ण विषय आहे.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धर्मादाय रूग्णालयांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मी या संदर्भात उच्च स्तरीय कमिटी तयार केली आहे. जी या घटनेचा तपास करेलच. पैशांची चिंता न करता रूग्णालयाने त्यांना अॅडमिट करून घेणे गरजेचे होते. मुख्यमंत्री कक्षाने देखील लक्ष घातले मात्र रूग्णालाय प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.

🕔 5.06pm | 4-4-2025📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/PUFaDu3Saf — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 4, 2025

भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखलकरून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.

Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”

मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.

Web Title: Cm devendra fadnavis first reaction about deenanath mangeshkar pregnant woman death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • crime news
  • Dinanath Mangeshkar Hospital
  • Pregnant woman

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.