Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime: शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास; कारवाईची मागणी

बारामती शहरात विद्या प्रतिष्ठान, टी.सी. कॉलेज, सुर्यनगरी, प्रगतीनगर, मेहता हॉस्पीटलच्या आसपासच्या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, या संस्थांमधून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2025 | 04:36 PM
Baramati Crime: शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास; कारवाईची मागणी

Baramati Crime: शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास; कारवाईची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
बारामती: शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थी विद्यार्थिनींना त्रास देत असतात. त्यांना चाप बसविण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी बारामती कोचिंग असोसिएशनने पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यावर पोलिस प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बारामती शहर पोलिस स्टेशन तसेच उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयासही याबाबत संपर्क साधला जाणार असल्याचे बारामती कोचिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
बारामती शहरात विद्या प्रतिष्ठान, टी.सी. कॉलेज, सुर्यनगरी, प्रगतीनगर, मेहता हॉस्पीटलच्या आसपासच्या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, या संस्थांमधून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. याच परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थी, विद्यार्थिनी जातयेत असताना त्यांना त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. आताच या प्रकारांना आळा घातला नाही तर पुढे जाऊन गंभीर परिणाम होऊ शकतात, यासाठी पोलिस प्रशासनाने या परिसरात गस्त वाढवावी. अशा टवाळखोर मुलांवर लक्ष ठेवावे या मागणीसाठी बारामती कोचिंग असोसिएशच्या सदस्यांनी आज बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांची भेट घेतली.
वैशाली पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशा योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. याखेरीज आपल्या परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले तर कळवा, पोलिस कर्मचारी तातडीने तिथे येऊन कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संध्या भगत व सुवर्णा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.

कामगार दुकानात दगड घेऊन घुसला अन्…; व्यापाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला

शहरातील सम्यक लाईफ स्टाईलचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांच्यावर शनिवारी (दि १) एका कामगाराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आनंद छाजेड यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये खोलवर जखम झाली असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सम्यक दुकानातील एका कामगाराला छाजेड यांनी काम व्यवस्थित करत नसल्याने काही वर्षांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते. त्याने गेल्या दोन वर्षात त्यांच्या दुकानात जाऊन तोडफोड करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. बारामती शहर पोलिसांनी त्या वेळेस त्याला अटक करुन कारवाईही केली होती.

Baramati Crime: कामगार दुकानात दगड घेऊन घुसला अन्…; व्यापाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला

शनिवारी हातात दगड घेऊन संबंधित कामगार दुकानात घुसला, त्याने काचा फोडल्या. दुकानात उपस्थित असलेल्या आनंद छाजेड यांच्या अंगावर दगड घेत तो धावून गेला, त्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दगड डोक्यात लागू नये म्हणून मागे सरकलेल्या आनंद यांच्या चेह-यावर दगड लागला, त्यांना आठ टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान या घटनेचा बारामती व्यापारी महासंघाने निषेध केला असून सोमवारी (ता. 9) सकाळी अकरा वाजता व्यापा-यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटून या बाबत निवेदन देणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेची दखल घेत तातडीने पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. 

Web Title: Coaching association police demanded to take action against mischievous boys education institutes baramati crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • police

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
2

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
3

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार
4

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.