Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narhari Zirwal: “… मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा विचार”; मंत्री नरहरी झिरवाळांचा स्पष्ट इशारा

अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल, असे झिरवाळ म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 17, 2025 | 09:49 PM
Narhari Zirwal: “… मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा विचार”; मंत्री नरहरी झिरवाळांचा स्पष्ट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याने याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी राज्यात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न विचारले. प्रश्नोत्तराच्या सत्रात उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, सध्याचा जो कायदा आहे, तो वर्षभरासाठीच लागू केला जातो आणि ही 2012 पासून चालत आलेली प्रथा आहे. मात्र यामध्ये आता बदल करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री झिरवाळ यांनी यावेळी राज्यभरात आतापर्यंत झालेल्या कारवायांची माहिती दिली. यात ₹450 कोटींचा मुद्देमाल जप्त आणि 10 हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल आणि मोठ्या प्रमाणात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल.

मोखाडा पोलीसांची धडक कारवाई; सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त, आरोपीला अटक

राज्यात विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये काही ठिकाणी कॅन्सरजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत दहिसर, मुलुंड, मालाड यांसारख्या परिसरात चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करून संबंधित गुटखा विक्रीसंदर्भात तपासणी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त

पालघर जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मोखाडा पोलीस ठाण्याने अशाच एका कारवाईत तब्बल ४.८४ लाख रुपयांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १० जुलै २०२५ रोजी मोखाडा पोलिसांना नाशिकहून जव्हारकडे येणाऱ्या एका वाहनामधून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

Web Title: Consideration of registering a case under mcoca for strict implementation of gutkha ban narhari zirwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • cancer
  • Gutkha seized
  • Maharashtra Government
  • Narhari Zirval

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
1

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा
2

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

राज्यात गुटखाबंदी उरली केवळ कागदावरच; खुलेआम होतेय गुटखा विक्री
3

राज्यात गुटखाबंदी उरली केवळ कागदावरच; खुलेआम होतेय गुटखा विक्री

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
4

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.