पुणे: रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर राज्यात नेत्यांच्या एकमेकांच्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. दरम्यान आज प्रांजल खेवलकरांसह अन्य आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना अटक करण्यात आली होती. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुणे पोलिसांनी आज प्रांजळ खेवलकर आणि अन्य आरोपींना कोर्टात हजर करण्यात केले होते. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रांजळ खेवलकर आणि अन्य आरोपींचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
डॉ. खेवलकरचा दुसरा मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप तसेच घटनास्थळावरून मिळालेले डीव्हीआर तसेच इतर सहा आरोपींचे जप्त मोबाईल व पेन ड्राईव्ह यांचा सायबर तज्ज्ञांकडून सविस्तर स्पष्ट अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्या अहवालावरून आरोपींकडे चौकशी करायची आहे. हुक्का तयार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करायचा आहे. आरोपींच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमधून मोठ्या प्रमाणात डेटा मिळाला असून त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील योगेश कदम यांनी केला. आरोपींच्यावतीने ॲड. ऋषिकेश गानू, ॲड. विजयसिंग ठोंबरे, ॲड. पुष्कर दुर्गे, ॲड. सचिन झालटे-पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
Rohini Khadse :”योग्य वेळी सत्य बाहेर येईल…; पती प्रांजल खेवलकरसाठी रोहिणी खडसेंची खास पोस्ट
पती प्रांजल खेवलकरसाठी रोहिणी खडसेंची खास पोस्ट
शरद पवार गटाच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर संयम राखण्याचे देखील सांगितले आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणावर रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून घडलेला प्रकार हा षडयंत्र असेल तर आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा दिला होता.