Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: चुलतभावाची हत्या करून बेपत्ता असल्याची तक्रार; ‘तो जिवंत आहे’ भासवण्यासाठी मेसेज आणि…

छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलत भावाचा खून करून तो बेपत्ता असल्याची तक्रार आरोपीनेच पोलिसांत दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मोबाईल लोकेशनमुळे पोलिसांना संशय आला आणि तपासात जंगलात पुरलेला मृतदेह सापडला. आरोपीने पैशांसाठी कुटुंबीयांची फसवणूकही केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 01:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ईर्ष्येतून चुलत भावाची जंगलात नेऊन हत्या.
  • आरोपीनेच बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
  • मोबाईल लोकेशन आणि मेसेजमुळे पोलिसांनी उलगडा केला.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या चुलत भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी भावाने आधी चुलतभाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्याने तो जिवंत आहे भासवण्यासाठी मृतकाच्या फोनमधून कुटुंबियांना मेसेज केले. त्या मेसेजमधून पैशांची मागणी केली. मात्र एके दिवशी आरोपीच्या फोनची आणि चुलत भावाची लोकेशन एकच दिसली आणि आरोपी पकडला गेला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून तपास सुरु आहे.

Odisa News: ६ हजार पगारावर नोकरीची सुरुवात, पण घरातून सापडला कोट्यवधींचा खजिना! दक्षता विभागही चक्रावला!

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राजू रामू बनसोड (वय 22, सध्या रा. नवजीवन कॉलनी, एन-11, हडको) असे आहे. तर आरोपीचे नाव रोहित संजय बनसोड (वय 21, रा. पाथ्री, ता. फुलंब्री) असे आहे. 24 मे रोजी रोहितने सिडको पोलिस ठाण्यात राजू हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यामध्ये 23 मेच्या मध्यरात्रीनंतर राजूला एन-11 परिसरात सोडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. राजुचा शोध पोलीस घेत होते. मात्र अनेक दिवस शोध घेऊनही राजुचा ठावठिकाणा लागत नव्हता.

पोलीस राजुचा कसून शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना राजू आणि रोहितमध्ये भावकीच्या कारणावरून नेहमी वाद होत असल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी राजू आणि रोहित या दोघांच्या मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर रोहितला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कशी केली हत्या?

रोहितने राजूला पाथ्रीजवळील जंगलात नेले. तेथे त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह जंगलातील पाचोळ्याखाली झाकून ठेवण्यात आला. त्यानंतर राजूचा मोबाईल स्वतःकडे ठेवून आरोपी तेथून निघून गेला. संशय दूर ठेवण्यासाठी रोहितने आणखी एक डाव आखला होता. राजूच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबीयांना संदेश पाठवत तो जिवंत असल्याचे भासवत होता. “मी गावाकडे जात आहे”, “मला पैशांची गरज आहे”, “खात्यावर पैसे पाठवा” अशा स्वरूपाचे संदेश तो राजूच्या नावाने पाठवत असे. त्यामुळे कुटुंबीयांना राजू जिवंत असल्याचा भास होत राहिला.

जवळपास १० हजाराची उकळपट्टी

राजू असल्याचे भासवत आरोपीने वारंवार पैशांची मागणी केली. त्यानुसार कुटुंबीयांनी राजूच्या खात्यावर दहा हजार रुपये तसेच आरोपीच्या खात्यावरही दहा हजार रुपये जमा केले होते. मात्र सतत पैशांची मागणी होत राहणे आणि राजूशी थेट संपर्क न होणे यामुळे कुटुंबीयांच्या मनात संशय निर्माण झाला.

हत्या कारण्यामागचं कारण काय?

जूचे कुटुंब शहरात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. दुसरीकडे, रोहितचे कुटुंब गावातच राहून मजुरीवर उदरनिर्वाह करत होते. याच कारणातून रोहितच्या मनात चुलत भावाविषयी मत्सर निर्माण झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आणि याच ईर्ष्येतून रोहितने राजुची हत्या केली.

पुढील कारवाई सुरु

रोहितने दिलेल्या कबुलीनंतर सोबत घेऊन पाथ्री परिसरातील जंगलात शोधमोहीम राबवली. तेथे राजू बनसोड याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.अश्याप्रकारे १५ दिवसानंतर या घटनेचा उलगडा झाला.

Beed Crime: मंचुरियनमध्ये गुंगीचे औषध, लॉजवर अत्याचार; लाखो रुपये आणि सोन्याचीही उकळपट्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: मृत तरुणाचे नाव राजू रामू बनसोड होते.

  • Que: आरोपीने पोलिसांची दिशाभूल कशी केली?

    Ans: आरोपीने राजू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि त्याच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना मेसेज पाठवले.

  • Que: पोलिसांनी आरोपीपर्यंत कसा पोहोच केला?

    Ans: मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: Cousin murdered then reported missing messages sent to create the illusion that he is alive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…
4

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.