भाईंदर /विजय काते :– मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अमली पदार्थ विक्री प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. अनेक गुन्ह्यांचा प्रमुख सूत्रधार आणि पोलिसांच्या नजरेआड गेलेला कुविख्यात आरोपी अरबाज ऊर्फ कासीम निसार खान याला गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईदरम्यान कासीम खान याच्याकडून ११६.७ ग्रॅम मॅफेड्रॉन (MD) हा अंदाजे २२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासादरम्यान समोर आले की, जप्त करण्यात आलेली मॅफेड्रॉनची खेप कासीम खान यानेच पुरवली होती. गुन्हा नोंद होताच तो फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारांची मदत घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. माहिती मिळाली की तो गोवा राज्यात लपून बसला होता.त्यानंतर पोलिसांचे एक विशेष पथक गोवा येथे रवाना झाले. २१ जुलै २०२५ रोजी पहाटे १.३० वाजता नॉर्थ गोवा येथून कासीम खान याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई मीरा-भाईंदर परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीवर मोठा आघात करणारी ठरली आहे. पोलिसांनी पुढील तपास अधिक गतीने सुरू केला असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.पोलिस उपायुक्त तथा गुन्हे शाखा प्रमुखांनी या कारवाईचे विशेष कौतुक करत, अमली पदार्थविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
मीरा-भाईंदरच्या जनतेला आपल्या नजरेत जर आमले पदार्थ सेवन करणारा किंवा विक्री करणारा कोण येत असेल कुणाला दिसत असेल तर आपण त्वरित पोलिसांची संपर्क साधावा आपण त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्यात येईल, असं आवाहन पोलीस उपायुक्त संदीप डोहीफोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे.नुकतंच काही दिवसांपूर्वी उरण बंदरावर देखील बेकायदा सिगारेटच्या तस्करी करणाऱ्या टोळीला पोलीसांनी मोठ्या शिताफिने अटक केली. DRI मुंबई युनिटला मिळालेल्या खाजगी माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमध्ये ‘कोटेड कॅल्शियम कार्बोनेट’ असे खोटे भासवून चक्क 1014 कार्टून परदेशी सिगारेट देशात घुसवण्याचा डाव होता. परंतु, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हा खेळ पुरता हाणून पाडत, कंटेनरमधून 1 कोटी 1 लाख 40 हजार सिगारेट जप्त केल्या.
Pune News : वाहनांची तोडफोड करणं भोवलं, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या