धक्कादायक! एम्समधील नर्सच्या २ मुलांना जिवंत जाळलं, घरात घुसून हत्या
बिहारची राजधानी पटनामधील जानीपूर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटन घडली आहे. गुन्हेगारांनी घरात घुसून एम्सच्या एका नर्सच्या दोन मुलांना जिवंत जाळलं आहे. या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अंजली आणि अंश अशी मृत मुलांची नावं आहेत. शोभा आणि ललन कुमार गुप्ता यांची ही मुलं होती. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट पसरली आहे.
चोरट्यांनी कुरिअर बॉयला मारहाण केली अन् दागिन्यांची बॅग लांबवली; कराड तालुक्यातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मुलं एकटी होती. नुकताच शाळेतून घरी आली होती. ही संधी साधत काही अज्ञातांनी घरात प्रवेश केला आणि दोन्ही मुलांना पेटवून दिलं. यात मुलांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी घराच्या परिसरात गर्दी केली होती. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. त्याच वेळी, गुन्हेगारांच्या या कृत्यानंतर स्थानिक लोकांमध्ये संताप आहे. मुले घरी एकटी असताना आणि शाळेतून नुकतीच आली असताना गुन्हेगारांनी ही घटना घडवल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजीही केली.
बनावट सोन्याचा व्यवहार उघडकीस; फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ठोकल्या बेड्या
फुलवारी शरीफचे डीएसपी-२ दीपक कुमार यांनी सांगितलं की , “दोन मुलांना जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. आम्ही घटनास्थळी आहोत. आम्ही तांत्रिक बाबींचाही तपास करत आहोत, या संदर्भात एक टीम देखील बोलावण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मुले घरी एकटीच होती.”घटनेनंतर, पोलिसांनी एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण केलं आहे. दरम्यान या मुलांची अज्ञातांनी हत्या केली की आग लागल्यामुळे होरपळून या मुलांचा मृत्यू झाला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.