देऊळगावराजे: दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे राहत्या घरी मंगळवारी( दि ८) मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पत्नी नंदा आवचर या जेष्ठ दांपत्यास लोखंडी गजाने जबर मारहाण केली. तसेच घरातील सात हजार रुपये रोख रक्कम व अंदाजे तीन तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
पोपट अप्पासाहेब आवचर ( वय ७५ ) व त्यांच्या पत्नी नंदा (६५ ) हे कुंटुब रात्री जेवण करुन घरामध्ये झोपले होते. मंगळवारी (दि ८) मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या आसपास तीन ते चार चोरटयांनी कटावणीच्या साहयाने दरवाजाची आतील कडी तोडुन घरात प्रवेश केला. त्यांनी पोपट अवचर व त्यांच्या पत्नी झोपेत असतानाच लोखंडी गजाने मारहाण केली . तसेच ओरडाओरडा केल्यास आणखी मारण्याची धमकी दिली.
घरातील रोख रक्कम सात हजार रुपये व अंदाजे तीन लाख किंमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करुन चोरटे पसार झाले. काही वेळाने अवचर यांनी शेजारी फोन केला. आवचर व त्यांच्या पत्नी यांच्या डोक्याला आणि कानाजवळ चोरटयांनी गंभीर मारहाण केल्याने त्यांना मोठी दुखापत झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच परिसराची पाहणी करीत नागरीकांकडुन घटनेची माहिती घेतली. तत्काळ पंचानामा करुन गुन्हा दाखल करण्याच्या सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी दडस यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या.
चोरट्यांची पण कमाल! वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश केला अन्…
दरम्यान, मागील महिन्याभरापासून दौंडच्या पूर्व भागात दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस घरफोडी आणि मारहाणीच्या घटना घडत असून ,चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांमधील चोरांचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे पोलीसांच्या कामकाजा बाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चोरट्यांची पण कमाल! वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश केला
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत.