Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘King Is Back’ स्टेटसवरून वाद , १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; तळेगाव दाभाडेतील घटनेनं खळबळ

मोबाईलवर ठेवलेल्या ‘King Is Back’ या स्टेटसच्या कारणावरून तळेगाव दाभाडे येथे एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात घुसून तीन जणांनी या मुलावर कोयत्याने वार केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2026 | 02:52 PM
‘King Is Back’ स्टेटसवरून वाद , १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; तळेगाव दाभाडेतील घटनेनं खळबळ

‘King Is Back’ स्टेटसवरून वाद , १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; तळेगाव दाभाडेतील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • ‘King Is Back’ स्टेटसवरून वाद
  • १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला
  • तळेगाव दाभाडेतील घटनेनं खळबळ
वडगाव मावळ : मोबाईलवर ठेवलेल्या ‘King Is Back’ या स्टेटसच्या कारणावरून तळेगाव दाभाडे येथे एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात घुसून तीन जणांनी या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

स्टेटसमुळे वाद पेटल्याची चर्चा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाने काही महिन्यांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि सुधारगृहातून बाहेर आलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत फोटो काढला होता. त्यानंतर त्याने ‘King Is Back’ असे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. या स्टेटसमुळे पूर्वीच्या हत्येच्या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच रागातून संबंधित मुलावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कपड्याच्या दुकानात घुसून हल्ला

ही घटना काल रात्री तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौक परिसरात घडली. हल्ल्याचे लक्ष्य ठरलेला १६ वर्षीय मुलगा एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. याच दुकानात तीन जण घुसले आणि त्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.

काही तासांत हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. तसेच, हल्ल्यानंतर आरोपी ज्या वाहनातून पळून गेले, त्या वाहनाच्या चालकासह संबंधितांना काही तासांत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला मदत

या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हल्ल्याच्या घटनाक्रमाचा तपास करण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. मोबाईल स्टेटससारख्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांमध्ये निर्माण होणारे वाद हिंसक वळण घेत असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधितांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा : भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात ही घटना घडली.

  • Que: हल्ल्यामागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: मोबाईलवरील ‘King Is Back’ स्टेटसवरून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे.

  • Que: हल्ल्यातील आरोपींवर काय कारवाई झाली?

    Ans: हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी संबंधितांना आणि वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: An incident involving an attack on a young man has taken place in talegaon dabhade nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
1

आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले
2

दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?
3

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले
4

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.