Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना घडल्या असून, डेक्कन आणि भारती विद्यापीठ परिसरात ५१ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 12:30 AM
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना घडल्या असून, डेक्कन आणि भारती विद्यापीठ परिसरात ५१ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी अद्याप फरार आहेत.

 

डेक्कन परिसरातील घटनेत, अशोक रामचंद्र देवधर (वय ७१, रा. कर्वे रोड) यांना फेसबुकवरील शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे जाळ्यात ओढण्यात आले. संबंधितांनी त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करून एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकारात १९ जानेवारी ते २४ मार्च २०२६ दरम्यान तब्बल ३७ लाख ३० हजार ७६५ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

तर दुसऱ्या प्रकरणात, भारती विद्यापीठ परिसरातील श्रीकांत बळीराम शेळके (वय ४३, रा. कात्रज) यांना युट्युब लिंकद्वारे शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांचे रजिस्ट्रेशन करून विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. याप्रकारात मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. दोन्ही प्रकरणांत आरोपींनी बनावट लिंक, अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा : एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक प्रकरणी गुन्‍हा दाखल

दोन हजार स्केअर फुटचा मोकळा प्लॉट दाखवून त्‍या बदल्‍यात ४८ लाख रूपये घेत प्लॉट न देता फसवणूक केल्याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हरिष गिरीधरीलाल चौधरी (वय ४८), दिनेशकुमार गिरीधरीलाल चौधरी (वय ४५), सुरेश गिरीधरीलाल चौधरी (वय ४२) आणि उर्मिला सुरेश चौधरी (वय ३५, रा. वाल्‍हेकर वाडी, चिंचवड) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमारता राजी चौधरी (वय ४१, रा. स्वामी रेसिडेन्सी, वाल्‍हेकरवाडी, चिंचवड) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार सन २०१८ ते फेब्रुवारी २०२६ दरम्‍यान घडला आहे.

Web Title: Cyber thieves have defrauded two people online under the lure of share trading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • fraud
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
2

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
4

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.