Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक

माझे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न लावण्यात आले. या लग्नात माझ्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले गेले. मला तीन मुलेही झाली. पुढे पतीने पुन्हा आपल्याच मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2025 | 03:40 PM
Haseena Mastan Mirza,

Haseena Mastan Mirza,

Follow Us
Close
Follow Us:
  • अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
  • मुलही हसीन मिर्झाची पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
  • आपण सर्वस्व गमावल्याची आर्त हाक
Haseena Mastan Mirza :  देशातील पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झाचे नाव ऐकताच लोक थरथर कापत होते. त्याने महाराष्ट्राच्या गुन्हेहगारी विश्वातच नाही तर संपूर्ण अंडरवर्ल्डवर राज्य केलं. पण आज याच हाजी मस्तानची मुलगी मदतीसाठी रडताना दिसत आहे. हाजी मस्तानच्या मुलीने म्हणजेच हसीन मस्तान मिर्झा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत थेट मदतीची याचना केली आहे. हसीन मस्तानने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायाची विनंती केली आहे. हसीन मिर्झाच्या पतीने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, अनेकदा गुन्हा दाखल करूनही आपल्याला न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (Crime news) 

हसीन मस्तान मिर्झा म्हणाली, “मला समजत नाही की आठ वेळा लग्न करून माझ्यावर बलात्कार करणारा गुन्हेगार माझ्याच बंगल्यात अजूनही आरामात कसा राहतो, माझ्याच पैशांचा उपभोग घेतो आणि माझ्या मालमत्तेतून भाडे वसूल करतो. त्याने माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. माझा बंगला जुहू येथील पाम स्प्रिंग्ज येथील बंगला क्रमांक १४ येथे आहे आणि त्याने हिलपार्क A2-306 येथील वीरा देसाई येथे माझा फ्लॅट देखील भाड्याने घेतला आहे.”

Parliament session live Updates: काँग्रेसच्या रॅली पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी? संसदेत सत्ताधारी आक्रमक

“मी सर्वकाही गमावले

हसीन मस्तान म्हणाली की, मी मदतीची याचना करत आहे. जर कोणाला खरोखरच मला मदत करायची असेल, तर कृपया या गुन्हेगाराविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करा किंवा योग्य वृत्तवाहिन्या उपलब्ध करून देण्यास मदत करा जेणेकरून मी बोलू शकेन आणि न्याय मिळवू शकेन. मला वाटते की न्यायालयाने त्याला लवकरात लवकर शिक्षा करावी, फक्त नवीन तारखा देत राहू नयेत. कृपया, मला तुमच्या पाठिंब्याची खरोखर गरज आहे. या बलात्कारीला माझे पैसे आणि मालमत्ता वापरून आरामात जगू देऊ नये. त्याने स्वतः एक पैसाही कमावला नाही. त्याच्याकडे असलेले सर्व काही माझे आहे. कृपया माझे दुःख समजून घ्या. त्याने माझी मालमत्ता, माझे पैसे आणि माझे आयुष्य हिरावून घेतले आहे. त्याने आठ वेळा लग्न केले आहे आणि र्व काही उद्ध्वस्त केले आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते: कृपया माझ्यावर विश्वास ठेवा, कृपया मला मदत करा, कृपया मी जिवंत असेपर्यंत मला साथ द्या.

वयावरून सुरू असलेल्या वादाला उत्तर

हसीनच्या वयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना ती म्हणाली, “माझ्या जन्मावेळी माझे वडील ५८ वर्षांचे होते आणि आई २९ वर्षांची होती. त्यामुळे अफवा पसरवणे थांबवा. माझ्याविषयी खोट्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट केल्या जात आहेत. अशा सर्व टिप्पण्यांची माहिती मी सायबर पोलिसांना दिली आहे.”

“हक्कांसाठी लढत राहणार”

“माझी ओळख, मालमत्ता, पैसे आणि आयुष्य हिरावून घेणारा एकटाच व्यक्ती नाही, तर यात आणखी लोक सामील आहेत,” असा आरोप करत हसीनने केला आहे. तसेच, “मी जिवंत असेपर्यंत माझ्या हक्कांसाठी लढत राहीन. हाजी मस्तान मिर्झा आणि सोना मस्तान मिर्झा यांची मी एकमेव मुलगी आहे.”

महाराष्ट्राची लेक ठरली देशाचा अभिमान; IMA मधून पहिल्यांदाच महिला ऑफिसर कॅडेट पास, कोल्हापूरच्या सई

अल्पवयीन लग्न व अत्याचाराचे आरोप

माझे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न लावण्यात आले. या लग्नात माझ्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले गेले. मला तीन मुलेही झाली. पुढे पतीने पुन्हा आपल्याच मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी विरोध केल्यानंतर मला घराबाहेर काढण्यात आले, असा आरोपही तिने केला. वयाच्या २६ व्या वर्षी तिने सर्वस्व गमावल्याची भावनाही हसीनने केली आहे.

पंतप्रधान व गृहमंत्र्यांना मदतीचे आवाहन

“मी या लढ्यात एकटी आहे,” असे सांगत हसीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

हसीन ही दिवंगत हाजी मस्तान मिर्झा आणि अभिनेत्री सोना मस्तान मिर्झा (खरे नाव शाहजहान बेगम) यांची मुलगी असल्याचा दावा केला जातो. सोना यांनी १९७१ मधील ‘बदनाम फरिश्ते’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. दरम्यान, हसीनने केलेले सर्व आरोप हे तिचे वैयक्तिक दावे असून, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट किंवा चौकशीअंती असल्याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 

Web Title: Daughter of underworld don haji mastan seeks help appeals to pm modi and amit shah for justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • crime news
  • crime news in marathi
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
1

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले
3

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
4

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.