Parliament session live Updates: काँग्रेसच्या रॅली पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी? संसदेत सत्ताधारी आक्रमक
काँग्रेस पक्षाच्या रॅलीत केलेल्या वक्तव्यावर जेपी नड्डा यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या रॅलीत घोषणा देण्यात आल्या, “मोदी, तुमची कबर आज नाही तर उद्या खोदली जाईल.” अशा घोषणा काँग्रेस पक्षाची मानसिकता दर्शवतात आणि प्रभावशाली लोकांची निराशा देखील प्रकट करतात. पंतप्रधानांविरुद्ध असे बोलणे आणि त्यांच्या मृत्यूची इच्छा करणे अत्यंत निंदनीय आहे. विरोधी पक्षनेत्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या घटनेबद्दल देशाची माफी मागावी. काँग्रेस पक्ष राजकारणाच्या इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे की तो कल्पनेपलीकडे आहे.’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या रॅलीत करण्यात आलेल्या कथित घोषणांचा निषेध केला.
Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबा
यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह घोषणांवरही टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. सोमवारी संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रिजिजू म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या रॅलीत जे बोलले गेले ते देशातील जनतेने ऐकले. लोकशाहीत आपण सर्व मित्र आहोत, शत्रू नाही.पण काल काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. लोकशाहीत इतकी खालची आणि लज्जास्पद पातळी यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती असे मला वाटते. संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि काँग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे.” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
किरेन रिजिजू यांनी एका जुन्या घटनेची काँग्रेसला आठवण करून देत म्हणाले की, २०१४ मध्ये, जेव्हा भाजपचे माजी खासदार निरंजन ज्योती यांनी विरोधी पक्षनेत्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींनी लगेचच संसदेत माफी मागण्यास सांगितले होते आणि खासदारांनीही माफीही मागितली होती. लोकशाहीत भाषेची पातळी सर्वांना समजली पाहिजे. भाजप आणि एनडीएने कधीही पालकांचे किंवा कोणत्याही नेत्याचे नाव घेताना “मृत्यू” हा शब्द वापरलेला नाही, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी परस्पर आदर आणि शुभेच्छा कायम असतात. लोकशाहीत प्रत्येकाला राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार आहे आणि टीका-विरोध होऊ शकतो, मात्र कुणालाही मारण्याबद्दल विचार करणे किंवा तसे बोलणे स्वीकारार्ह नाही. उघडपणे विरोधकाच्या हत्येला उद्युक्त करणारी मानसिकता कोणती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Pune Crime: खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून हल्ला, शिक्षक शिकवत होते






