Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

रूम पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आलेल्या दोन मित्रांचा परतीचा प्रवास काळ ठरला. दौलताबाद घाटात बस आणि स्पोर्ट्स बाईकची भीषण धडक होऊन ३० वर्षीय अक्षय दवंगे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 11:25 AM
Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • दौलताबाद घाटात बस-दुचाकीची समोरासमोर धडक
  • रूम पाहून गावाकडे परतताना अपघात
  • घाटी रुग्णालयात उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगर : भाड्याने रूम पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आलेल्या दोन मित्रांचा परतीचा प्रवास दुर्दैवी ठरला. दौलताबाद घाटातील मलिक हॉटेलसमोर बस आणि स्पोर्ट्स बाईकची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अक्षय साहेबराव दवंगे (३०, रा. मनूर, ता. वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अक्षय कारभारी बोडखे (३३) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय दवंगे आणि अक्षय बोडखे हे दोघेही मनूर येथील रहिवासी आहेत. अक्षय दवंगे एका कंपनीत कामाला असून, काही दिवसांपासून तो सुटीवर होता. पुन्हा कंपनीत रुजू होण्यासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर परिसरात भाड्याने रूम शोधण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी रविवारी दोघे मित्र दुचाकीवरून वाळूज-गंगापूर एमआयडीसी परिसरात आले होते. रूम पाहिल्यानंतर दोघेही दुचाकीवरून गावाकडे मनूरच्या दिशेने परत निघाले. दौलताबाद-खुलताबाद मार्गावरील मलिक हॉटेलसमोर आल्यानंतर त्यांच्या स्पोर्ट्स बाईकची समोरून येणाऱ्या बसशी जोरदार धडक झाली. धुळे येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी बस (एमएच २० बीसी ३४३१) दौलताबाद घाटातून खाली येत होती. बसमध्ये सुमारे ५० ते ५५ प्रवासी असल्याची माहिती आहे. घाटातील वळणावर बस आणि दुचाकीची धडक झाल्याने दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

हेही वाचा: Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, दीपक मते यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यासाठी १०८ रुग्णवाहिकेसह नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचीही मदत घेण्यात आली. दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय दवंगे याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय बोडखे याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

कामावर रुजू होण्यासाठी रूमचा शोध

अक्षय दवंगे काही दिवसांपासून कंपनीच्या कामातून सुटीवर होता. पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर परिसरात राहण्याची व्यवस्था करायची होती. त्यासाठी तो मित्र अक्षय बोडखे याच्यासोबत रूम पाहण्यासाठी शहरात आला होता. रूम पाहून गावी परतताना दौलताबाद घाटात त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन्ही तरुण अविवाहित होते. या दुर्दैवी घटनेमुळे मनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास दौलताबाद पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Daulatabad ghat bus bike accident akshay davange death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Accident
  • Accident Case
  • Accident News
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा
2

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
3

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
4

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.