News Delhi: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याची सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. यानंतर रेखा गुप्तांवर हल्ला केलेल्या हल्लेखोराची माहिती समोर आली आहे. आरोपीने हल्ला का केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण रेखा गुप्ता सुरक्षित असून त्या त्यांचे काम करत आहेत.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा गुप्तावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेश भाई खिमजी भाई सकारिया असे आहे. तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहेत.रेखा गुप्तांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी करून त्याला यांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच रेखा गुप्ता यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्या त्यांच्या कामासाठी निघून गेल्या. तर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर विभागाने आरोपीची चौकशी केली. तो गुजरातचा रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.
आरोपीने त्याचे नाव राजेश भाई खिमजी भाई सकारिया असे सांगितले आहे. राजेश ४१ वर्षांचा असून तो गुजरात येथील राजकोटचा रहिवासी आहे. त्याच्याकडून काही ओळखपत्रे आणि कागदपत्रे सापडली आहेत. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सकारिया हातात काही कागदपत्रे धरून होता. त्याने तो कागद मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हातात दिला आणि अचानक त्यांचे केस ओढले. तर काही लोकांनी त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारल्याचेही सांगितले. रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करताना तो जोरजोरात ओरडत होता आणि अपशब्द वापरत होता. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतरही तो मोठमोठ्याने ओरडत होता. राजेश खिमजीची आई भानू म्हणाल्या की, राजेश कुत्र्यांचा प्रेमी आहे आणि दिल्लीत कुत्रे पकडले जात असल्याने तो रागावला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी साप्ताहिक जनसुनावणी घेत असताना त्यांना भेटण्यासाठी आलेल्या एका इसमाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनसुनावणी घेत असताना एक व्यक्ती आपली तक्रार घेऊन तिथे पोहोचला आणि त्यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांना थप्पड मारली. आरोपी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचे नाव राजेश भाई खिमजी साकारिया असून तो ४१ वर्षांचा आहे आणि राजकोटचा रहिवासी आहे. आरोपीला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या हल्ल्याची माहिती गृह मंत्रालयाला दिली आहे.