ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
Political News : दिल्ली : मी गांधीवादी, नेहरूवादी आणि राजीववादी होते, पण राहुलवादी नाही, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधींवर आगपाखड केली. केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पिनारायी विजयन हे केरळचे मुख्यमंत्री राहतील, अशा आशयाचे विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते. त्या विधानाशी फारकत घेत काँग्रेस (Congress) पक्षाने अय्यर यांचा मागील काही वर्षांपासून पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून अय्यर संतप्त झाले आहेत. (Political News)
ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी रविवारी सीपीआय (एम) नेते पिनारायी विजयन केरळचे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला होता. व्हिजन २०३१: विकास आणि लोकशाही या आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना त्यांनी सांगितले की, पंचायती राज व्यवस्थेत केरळचे सर्वोच्च स्थान कायदेशीररित्या सुरक्षित करण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यासाठी सूचनाही दिल्या, ते म्हणाले की, या ध्येयाकडे सर्वात प्रशंसनीय प्रगती करणारे राज्य म्हणजे केरळ आहे, जिथे मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाचे राज्य आहे. अय्यर यांच्या भूमिकेशी काँग्रेसने असहमती दर्शवली आहे.
हे देखील वाचा : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ
बाकाही खेरा फक्त एक कठपुतळी
काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खैरा यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर गेल्या काही वर्षांपासून पक्षाशी कोणताही संबंध नाही. ते केवळ त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बोलतात आणि लिहितात, त्यावर मणिशंकर अय्यर यांनी खेरा यांच्यावरही टीका केली. आज के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे इतकी महत्त्वाची जबाबदारी आहे, पवन खेरासारख्या माणसाला पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पक्ष इतका गंभीर मुर्खपणा कसा करू शकतो? खेरा फक्त एक कठपुतळी आहेत, असे अय्यर म्हणाले आहेत.
आसाममध्ये काँग्रेसला झटका
आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षाने अलिकडेच त्याना आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी वाटाघाटींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली होती. भूपेन बोरा यानी सोमवारी सकाळी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, हा स्वाभिमानाचा विषय आहे आणि मी पक्षाच्या कारभाराबद्दल केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्या चिंता व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा : ’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार
खारगे समितीचा अहवाल सादर
पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या खरगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आला आहे. अधिकृतरीत्या अहवालातील तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. महसूल मंत्री या अहवालाचा अभ्यास करून आवश्यक ती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित अधिकारी किंवा व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई, प्रकरणाची पुढील चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे सांगितले जाते. समितीने हा अहवाल सार्वजनिक करावा अशी शिफारसही केली असल्याचे समजते. या जमिन व्यवहारप्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने गेल्या काही महिन्यांपासून जमीन व्यवहाराशी संबंधि कागदपत्रांची छाननी, महसूल विभागातील नोंदींच तपासणी तसेच संबंधित अधिकारी व पक्षकारांचे जबान नोंदवण्याचे काम केले. या अहवालात जमीन हस्तांतरण प्रक्रिया, झोन बदल, नोंदणीतील त्रुटी तसेच महसूल अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.






