दोन दुचाकींचा अपघात (फोटो- सोशल मिडिया)
खेड तालुक्यात घडला भीषण अपघात
वेरळ भागात एक गंभीर जखमी
मागून येणाऱ्या गाडीने दिली धडक
खेड: खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ वाशिष्टी डेरी परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा २९ जानेवारी २०२६ रोजी दु. ११.२५ च्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी क्र. एमएच ०८ एन ६२४६ ही दुचाकी मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातात दुचाकीस्वार राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (वय ४०, रा. खेड) रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघात मदतीसाठी कार्यरत असलेली जगदुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी वेळेत मदत केल्याने जखमी रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले.
Nagpur Crime : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू
65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू
पुण्यातून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉल्कसाठी बाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला भरधाव कारणे धडक दिल्याचे समोर आले आहे. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पहाटे 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान झाला. अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आशा पाटील (वय 65) असे होते.
काय घडलं नेमकं?
आशा भोसले या महिला पहाटेच्या 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी एका भरधाव कारणे धडक दिले आणि तिथून फरार झाला. या धडकेत आशा भोसले यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. अश्या स्थितीत त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते, नंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
वाहनचालकांचा शोध सुरु
या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला. घडलेला सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याच सीसीटीव्हीच्या आधारे वाहनचालकांचा शोध सुरु आहे. या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे. या वाढत्या हिट अँड रन प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
Crime News: चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याची बोरमाळ लंपास; दार तोडून थेट…
सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव
पुणे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची वारंवार मागणी करत होती.याचाच राग मनात धरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून हत्येत वापरलेला लोखंडी चाकूही जप्त करण्यात आला आहे.






