Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: मोलकरणी बनून घरात शिरायच्या, विश्वास मिळाल्यावर करायच्या लाखोंची चोरी, दोन बहिणींना अटक

नोएडामध्ये मोलकरीण म्हणून काम करत घरातील सदस्यांचा विश्वास जिंकून लाखोंची चोरी करणाऱ्या दोन बहिणींचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पश्चिम बंगालमध्ये लपलेल्या या आरोपींकडून तब्बल 88 लाखांचे दागिने व रोख जप्त करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 24, 2025 | 02:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन्ही बहिणी गेली 5 वर्षे नोएडात राहून मोलकरीण बनून चोरी करत होत्या.
  • सीसीटीव्ही, सर्व्हिलन्स व सूत्रांच्या आधारे आरोपींना बंगालमधून अटक.
  • 88 लाखांचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त; दागिने वितळवून विकायच्या.
दिल्ली: दिल्लीतून चोरीची एक घटना समोर आली आहे. नोएडा पोलिसांनी दोन बहिणींना अटक केली आहे. या दोघी गेल्या बऱ्याच वर्षांपासून मोलकरीण म्हणून काम करत होते. नंतर त्याच घरातून चोरी करायचे. नोएडा पोलिसांनी दोन बहिणींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ८८ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मामुनी जना उर्फ मोनी आणि आशा उर्फ मोनी यादव अशी आरोपी महिलांची नावे समोर आली आहेत. या दोघी पश्चिम बंगालच्या मूळ रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून त्या नोएडामध्ये राहत होत्या.

कशी केली अटक

शहरात चोरीच्या घटना वाढल्यानंतर, विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक सूत्रांची माहिती आणि मोबाईल सर्व्हिलांस मदतीने अखेर पोलिसांनी दोन संशयित महिलांचा शोध घेतला. चोरी केल्यानंतर त्या महिला पश्चिम बंगालला पळून गेल्या असल्याचं तपासात दिसून आलं. आरोपींच्या शोधात पोलीस पथक पश्चिम बंगालला पोहोचलं आणि मेदिनीपूर जिल्ह्यात छापा टाकून या दोन्ही बहिणींना अटक करण्यात आली.

Uttar Pradesh Crime: विवाहबाह्य संबंध, अनपेक्षित गर्भधारणा…, ३ मुलांच्या आईचा लग्नासाठी दबाव आणि भयंकर घडलं

कशी करायचे चोरी

या दोन्ही महिला आधी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करत होते. सुरुवातीला, त्या घरात चांगलं काम करून कुटुंबीयांचा विश्वास संपादन करायच्या आणि नंतर जेव्हा त्यांना संधी मिळत होती. तेव्हा त्या सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी करायच्या. चोरी झाल्यानंतर, संशय येऊ नये म्हणून त्या घरकामासाठी त्या घरात पुन्हा जात नव्हत्या. त्यानंतर या दोघी महिला चोरी केलेले दागिने वितळवून रस्त्यावर भेटलेल्या लोकांना विकायच्या.

दोघीनी चोरीची दिली कबुली

एकीने पोलिसांकडे कबूल केले की तिने सेक्टर १२ मधील एका घरातून दागिने चोरले होते आणि त्यातील काही दागिने विकून ३ लाख रुपये मिळवले. दुसरीने सांगितले की, तिने ९ ऑक्टोबर रोजी सेक्टर ४९ मधील एका घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला होती. चोरी झाल्यानंतर, ती दिवाळीनंतर तिचं पतीसोबत पश्चिम बंगालला निघून गेली.

किती रुपयांची केली चोरी

या प्रकरणी सेक्टर-२४ पोलिसांनी पेंडेंट, चेन, मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, हिऱ्यांचे दागिने आणि 1,54,810 रुपये रोख जप्त केले. सेक्टर-49 पोलिसांनी सोन्याची बिस्किटे, बांगड्या आणि 1,34,500 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली. एकूण 88 लाख रुपयांची पोलिसांनी केले जप्त. दोन्ही बहिणींना अटक करण्यात आली असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरी करणाऱ्या महिला कोण होत्या?

    Ans: बहिणी

  • Que: एकूण किती रकमेची जप्ती झाली?

    Ans: 88 लाख

  • Que: पोलिसांनी आरोपींना कुठून अटक केली?

    Ans: बंगाल

Web Title: Delhi crime two sisters arrested for stealing lakhs after gaining their trust

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime: विवाहबाह्य संबंध, अनपेक्षित गर्भधारणा…, ३ मुलांच्या आईचा लग्नासाठी दबाव आणि भयंकर घडलं
1

Uttar Pradesh Crime: विवाहबाह्य संबंध, अनपेक्षित गर्भधारणा…, ३ मुलांच्या आईचा लग्नासाठी दबाव आणि भयंकर घडलं

Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल
2

Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Dhule Crime: ‘मेला तर गाडून टाकू…’ अपहरण करून बैलगाडीला बांधलं, खाली आग लावून…; धुळ्यातील क्रूर प्रकार!
3

Dhule Crime: ‘मेला तर गाडून टाकू…’ अपहरण करून बैलगाडीला बांधलं, खाली आग लावून…; धुळ्यातील क्रूर प्रकार!

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन
4

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.