
crime (फोटो सौजन्य: social media)
Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन
तक्रारीत काय?
शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंटू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशु यास जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला शिरपूर जळोद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून एक लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आले. त्यांनतर बैलगाडीच्या खाली जाळ पेटवला. गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पात्र तापला आणि हिमांशू गंभीररीत्या भाजला. त्याने डॉक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत. मी आणून देतो, असे सांगत दोघांच्या स्वतःची सुटका करून घेतली. घरी परतल्यावर आई- वडिलांना त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. आई वडिलांना धक्काच बसला. पीडित हिमांशूंवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जेसीबीने खड्डा खणून गाडून टाकू
या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या मामाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याने सांगितले की, माझ्या भाच्याला शेतात घेऊन जाऊन हे सर्व करण्यात आले. त्याला खाली आग लावून चटके देण्यात आले. त्याला मारुन टाकण्याचीही धमकी दिली. ट्रॅक्टरच्या लाईट चोरल्याची कबुली देत नाही तोपर्यंत त्याला चटके देण्यात आले. हा मेला तर जेसीबीने खड्डा खणून त्याला दाबून टाकू, असेही मारहाण करणाऱ्यांनी म्हटल्याचे मुलाच्या मामाने सांगितले.
गुन्हा दाखल
शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
Ans: कोळी
Ans: 14
Ans: 2