Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांना मध्यरात्री वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अटक करण्यात आली. गर्जे, त्यांची बहीण आणि दीरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 24, 2025 | 09:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • वरळी पोलिसांसमोर मध्यरात्री अनंत गर्जे यांचे आत्मसमर्पण
  • गर्जे, त्यांची बहीण व दीरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
  • अंजली दमानियांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुंबई: गौरी पालवे- गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर वरळी पोलिसांसमोर रविवारी रात्री १ वाजता अनंत गर्जे यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. अनंत गर्जे यांना आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात अनंत गर्जे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी पोलीस न्यायालयात नेमकी काय माहिती देतात हे महत्वाचं आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी अनंत गर्जे यांच्या वकिलांकडून जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद होणार.

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…

वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.वरळी पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

निवेदन जारी

गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अनंत गर्जे यांनी दिनांक २४ रोजी मध्यरात्री वरळी पोलीस स्थानकात हजर झाले. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी, यासाठी अनंत गर्जे स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

अंजली दमानियाने व्यक्त केली शंका

सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहे. गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक का केली नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

जळकोट ते पुणे… खुनी महिलेचा प्रवास! एका उसनवारीच्या वादातून घडलेल्या क्रूर कृत्याचा पोलिसांनी असा लावला छडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनंत गर्जे कुठे आत्मसमर्पण केले?

    Ans: वरळी

  • Que: प्रकरणात कोणती व्यक्ती मृत्यूमुखी पडली?

    Ans: गौरी पालवे- गर्जे

  • Que: पोलिसांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कार्यकर्त्या?

    Ans: अंजली दमानिया

Web Title: Mumbaipankaja mundes pa arrested in gauri palve suicide case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Dr. Gauri Palve Case update:  गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक
1

Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…
2

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!
3

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!

Gauri Palve Sucide: आत्महत्या की घातपात? मुंडेंच्या PA च्या बायकोच्या आत्महत्येवर अंजली दमानियांच्या मनात वेगळाच संशय
4

Gauri Palve Sucide: आत्महत्या की घातपात? मुंडेंच्या PA च्या बायकोच्या आत्महत्येवर अंजली दमानियांच्या मनात वेगळाच संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.