
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
मृत महिलेचं नाव प्रीती आहे. ती सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बांसी येथे राहत होती. तिला ३ मुले होती. प्रीतीचा गावातील २८ वर्षीय दिलीप कुमार अग्रहरी नावाच्या तरुणासोबत काही काळापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून प्रीती गर्भवती राहिली. तिच्या गर्भात दिलीपचं बाळ वाढत होत. याच कारणामुळे प्रीती तिच्या प्रियकरावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत असल्याने दिलीपने भयंकर कट रचला.
लग्नासाठी पळून जाऊ म्हणत बोलावले आणि…
दिलीपने लग्नासाठी पळून जाऊ असे म्हणत तिला बस्ती येथे बोलावलं. प्रीती तिच्या लहान मुलाला सोबत घेऊन आली. संधी मिळताच आरोपी दिलीपने प्रीतीच्या गळ्यावर निर्दयीपणे वार केले आणि तिची हत्या केली. हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी त्याने मृतदेहाचे कपडे फाडले आणि दारू तसेच पाण्याच्या बाटल्या घटनास्थळी ठेवल्या, जेणेकरून पोलिसांना बलात्कार असलयाचे वाटेल. त्यानंतर दिलीपने मुलाला तिथेच रडतांना सोडून तिथून पळ काढला. नंतर, वाटेने जाणाऱ्या एका स्थानिकाने तिथे मुलगा रडताना पाहिलं आणि लगेच पोलिसांना या घटनेबाबत कळवलं. मृत महिलेच्या सासूने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीवरून, रुधौली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
आरोपी अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारवाई करून आरोपी दिलीप अग्रहरीला अटक केली आहे. हत्येत वापरलेला चाकू सुद्धा घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजवरून दिलीप घटनेपूर्वी प्रीतीसोबत होता, असं स्पष्ट झालं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली नाही, त्यामुळे प्रेमसंबंध आणि नको असलेली गर्भधारणा हेच हत्येमागचं एकमेव कारण असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
Ans: विवाहबाह्य
Ans: दिलीप
Ans: बस्ती