Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

दिल्लीतील मुनीरका परिसरात पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राची मदत मागितली. मात्र मित्राने 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिल्याने संपूर्ण कट उघड झाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 10:27 AM
पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयने 20 वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा आरोप; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राकडे मदत मागितली.
  • मित्राने आरोपीची साथ न देता 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली; पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.
  • मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
दिल्लीतील मुनीरका परिसरातून हत्येचे नवे प्रकरण समोर येत आहे. मुख्य म्हणजे हत्याचा हा कट कोणत्या पुराव्यावरुन नाही तर मित्राच्या बेवफाईने उघडकीस आला. माहितीनुसार, २४ वर्षीय व्यक्तीने आपल्या २० वर्षीय पत्नीचा खून केला. व्यक्ती व्यावसायाने एक डिलिव्हरी बाॅय होता. व्यक्तीने हत्येनंतर कथितरित्या त्याच्या एका मित्राला फोन करुन हत्याची सर्व घटना सांगितली. पत्नीची हत्या केली असून मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी मदत हवी आहे या मागणीसह त्याने मित्राला संपूर्ण घटना सांगितली. तथापि, मित्राने मात्र यात कायद्याची पुढे ठेवले. त्याने आरोपी मित्राची मदत न करता थेट ११२ वर काॅल करत पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

Nashik Crime: कर्ज फेडलं… तरी कोट्यवधींची जमीन विकली? शेतकऱ्याचा गंभीर आरोप; ताबा घेताना पोलिसांशी झटापट

मित्राच्या माहितीवरुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पत्नीच्या मृतदेहासह आरोपीला अटक केली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून संबंधित आरोपीची कसून चाैकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी किशनगड पोलीस ठाण्याला पीसीआरद्वारे माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली असून मृतदेहाच्या बंदोबस्तीसाठी तो मित्राची मदत घेत आहे. माहिती मिळताच पोलिस सतर्क झाले आणि तत्काळ घटनास्थळी दाखल होण्याचा निर्णय घेतला. तक्रारदाराच्या माहितीच्या आधारे आरोपी अनुराग उर्फ ​​अभिषेक (२४) याला अटक करण्यात आली आहे.

चाैकशीत समोर आलं की, आरोपीने घटनेच्या एक दिवसाआधी १ ऑगस्टच्या रात्री आपल्या मित्राला घरी बोलावून घेतले. मित्र जेव्हा घरी पोहचला तेव्हा त्याने आरोपीने त्याला पत्नी कनिकचे मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दाखवले, तिच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. आरोपानुसार, अनुरागने त्याचवेळी मित्रासमोर पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी मदद हवी आहे असेही त्याने यावेळी स्पष्ट केले. तथापि, मित्राने यात सामंजस्य दाखवत वेळीच याची माहिती पोलिसांनी देण्याचा निर्णय घेतला. त्याने एक बहाणा करून आरोपीकडून आपला मोबाईल फोन परत मिळवला आणि घटनास्थळावरून निघून गेल्यावर, घटनेची माहिती पोलिसांना देण्यासाठी तात्काळ ११२ वर फोन केला.

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. यानंतर मृतदेहाला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर पत्नीला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ सील करुन क्राईम टीम आणि फाॅरेंसिक लॅब टीमने घटनास्थळावरुन सर्व पुरावे गोळा केले. पोलिस सध्या घटनेचा सखोल तपास करत असून हत्येमागचे नेमके कारण काय हे समजून घेण्याचे काम पोलिस करत आहेत.

 

Web Title: Delhi delivery boy kills wife friend calls 112 police munirka murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • Murder Case

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.