crime (फोटो सौजन्य : social media)
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तीन पुरुषांशी लग्न केले आणि चौथ्याला आपल्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती. सासूला संशय आला म्हणून सुनेने तिला संपल्याची घटना समोर आली आहे. ही घटना इंदूरच्या विजयनगर परिसरात घडली आहे. महिलेचे नाव नेहा चौधरी आहे. पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
तलाठी आणि तरूणीचा १३०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह, चिठ्ठी सापडली….
काय आहे प्रकरण?
विजयनगर परिसरात नेहा चौधरी राहत होती. नेहाने सर्वप्रथम नर्मदापुरम जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील ब्रजेश पटेल यांच्याशी लग्न केलं होत. या लग्नापासून तिला एक मुलगा देखील आहे. काही काळानंतर त्यांचे संबंध बिघडले आणि त्यांचा घटस्फोट झाला. मुलगा त्यांच्या वडिलांसोबत राहू लागला. घटस्फोटानंतर ती मुंबईला गेली आणि तिथे ती रोहित नावाच्या एका तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. त्यांच्यात देखील वाद होऊ लागले आणि नेहाने रोहितवर बलात्काराचा आरोप लावला.
त्यांनतर ती इंदूरला शिफ्ट झाली. इंदूरच्या संदीप चौधरींशी लग्न केला आणि इंदूरच्या विजयनगर परीसरात राहू लागली. या लग्नात सुरवातीपासून वाद होत होते. नेहाची सासू तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या वाढत्या दुराव्याबद्दल चिंतेत होती. सासू नेहाला मुलं न होण्याबद्दलही टोमणे मारायची.
सूत्रांनुसार, नेहा ‘आदर्श’ नावाच्या चौथ्या तरुणाशी फोनवर बोलत होती. सासूने यावर अनेकदा आक्षेप घेतला होता. नेहाने पहिल्या मुलास ऑपेरेशन करून घेतले होते, जेणेकरून तिला पुढे मुलं होणार नव्हते. यामुळे ती लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत राहिली. संदीपने काही दिवसांपूर्वी पोलिसांना सांगितलं होतं की, त्याची पत्नी सतत कोणत्यातरी मुलाशी बोलते आणि आत्महत्येची धमकी देते. मुलांबाबत घरात रोज भांडण होत होती.
रविवारी रात्री नेहाने आपल्या सासूला बाथरूममध्ये बोलावलं होत. तिने तिच्या डोक्यावर जड वस्तूचे वार करून तिची हत्या केली. जेव्हा संदीप घरी परतला तेव्हा त्याला आपल्या आईचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नेहा चौधरीला ताब्यात घेतले आहे. मृतदेह एम.वाय. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस नेहाचे फोन कॉल्स, तिचे जुने संबंध आणि हत्येच्या हेतू काय होता याचा तपास करत आहे.
Pune Crime: भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेंवर महिला पोलीस निरीक्षकाकडून विनयभंगाचा आरोप; एफआयआर दाखल