संग्रहित फोटो
नाट्यगृहांमधील विविध सुविधांबाबत कलाकारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्याचा परिणाम कलाकारांसह प्रेक्षकांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे नाट्यगृहांमधील सुविधांची नियमित देखभाल आणि आवश्यकतेनुसार वेळेत दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे नाट्यगृहांच्या सुविधांमध्ये कितपत सुधारणा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
१० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील दुरुस्तीच्या कामांसाठी सभागृह १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. खुर्च्या आणि वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती, तसेच इतर आवश्यक कामे येथे केली जात आहेत. ही कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या कालावधीत सभागृहात नाट्यप्रयोग किंवा अन्य कार्यक्रम घेता येणार नाहीत.
महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, “काही नाट्यगृहांमध्ये सध्या देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात अन्य नाट्यगृहांमध्येही आवश्यकतेनुसार कामे केली जातील. कलाकारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.”
कार्यक्रम सुरू ठेवून बालगंधर्वमध्ये नूतनीकरण
बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत कलाकारांकडून अनेक दिवसांपासून तक्रारी करण्यात येत होत्या. त्याची दखल घेत स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी संपूर्ण नाट्यगृह बंद ठेवण्यात आलेले नाही. नाट्यप्रयोग आणि अन्य कार्यक्रम सुरू ठेवूनच नूतनीकरणाचे काम केले जात आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठी दुरुस्ती
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील खुर्च्या, ध्वनिव्यवस्था, रंगमंच आणि व्हीआयपी कक्षाशी संबंधित दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे दुरुस्तीची कामे कधी सुरू करायची, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि त्याचा नाट्यप्रयोग व अन्य कार्यक्रमांवर किती परिणाम होईल, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे कामठे यांनी सांगितले.
Ans: महापालिकेकडून नाट्यगृहांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
Ans: पुण्यातील नेहरू भवन नाट्यगृह दुरुस्तीच्या कामांमुळे बंद राहणार आहे.
Ans: नेहरू भवन बंद राहण्याची नेमकी तारीख दिलेल्या माहितीत नमूद केलेली नाही.






