पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने वेगाने वाहन चालवीत अनेक वाहनांना धडक दिल्याचे सांगितले आहे. यावेळी तरुणासोबत आणखी काही तरुणही असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना पुण्यातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठेत घडली आहे.
काय घडलं नेमकं?
या व्हिडिओमध्ये एक तरुण गोंधळ घालतांना दिसत आहे. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत होता. यादरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली.यांनतर स्थानिकांनी त्या तरुणाला कारमधून बाहेर काढलं. घटनेच्या ठिकाणी बराच वेळ स्थानिक आणि तरुणांमध्ये बाचाबाची सुरु होती. इथे मोठा राडा झाला. या तरुणांसोबत काही तरुणीसुद्धा दिसत आहे. यापैकी एक तरुणी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला स्वतःचा भाऊ असल्याचे सांगत आहे. ती त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरुण स्थानिकांशी भांडण करत होता. मी पोलिसांचा मुलगा आहे, मला दारू पिऊ द्या. असे तो म्हणत आहे. ही घटना पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल केली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
काही प्रत्यक्षदर्शींच्या मते या कारमध्ये चौघेजण होते. यामध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. चौघेजण मद्यधुंद अवस्थेत होते असं सांगितलं जात आहे. या तरुणांच्या कारने अपंग व्यक्तीस जोरदार धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. दरम्यान हे चौघेजण नेमकं कुठले याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
Ans: नारायणपेठ
Ans: मद्यधुंद
Ans: तक्रार






