Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! दरोड्याला प्रतिकार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण; पत्नीचा मृत्यू तर पतीच्या मेंदूला गंभीर मार

झोपेतच टेकाळे दाम्पत्यावर अचानक हल्ला करून त्यांना मारहाण केली. माधुरी टेकाळे यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने व देवघरातील चांदीच्या मूर्त्या दरोडेखोरांनी पळवून नेल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 20, 2025 | 07:55 AM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Follow Us:

मोताळा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात सशस्त्र दरोडेखोरांचा प्रतिकार करताना झालेल्या मारहाणीत डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. तर पशुवैद्यकीय डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही घटना बुलढाण्याच्या मोताळा दाभाडी येथे रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : Crime News: विवाहित पुरुषाने डॉक्टर तरुणीला दिले लग्नाचे आमिष; अन् तिच्याकडून थेट …; वाचा दुर्दैवी घटना

पोलिस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून, दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. माधुरी गजानन टेकाळे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर डॉ. गजानन तुकाराम टेकाळे (वय ४२) असे गंभीर जखमी पशुवैद्याचे नाव असून, त्यांच्यावर जळगावात उपचार सुरू आहेत. मलकापूर-बुलढाणा रोडवरील दाभाडी येथे डॉ. टेकाळे यांचे घर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी दरोडेखोरांनी प्रवेश केला.

झोपेतच टेकाळे दाम्पत्यावर अचानक हल्ला करून त्यांना मारहाण केली. माधुरी टेकाळे यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने व देवघरातील चांदीच्या मुर्त्या दरोडेखोरांनी पळवून नेल्या. यादरम्यान दरोडेखोरांना टेकाळे दाम्पत्यांनी प्रतिकार केला. त्यामुळे दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत माधुरी या जागीच मृत्युमुखी पडल्या. तर डॉ. गजानन टेकाळे जखमी झाले. त्यांच्या मेंदूला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मलकापूर येथे उपचार करुन पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले.

सुदैवाने मुलगी बचावली

डॉ. गजानन टेकाळे दररोज सकाळी गाईचे दूध काढतात. मात्र, रविवारी सकाळचे सहा वाजूनही त्यांना जाग आला नाही. त्यांच्या लहान भावाच्या पत्नीने घरी जाऊन बघितल्यानंतर त्यांना धक्का बसला. डॉ. टेकाळे जखमी तर त्यांची पत्नी माधुरी मृतावस्थेत आढळून आल्या. विशेष म्हणजे, टकाळे दाम्पत्याची दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सहलीनिमित्त बाहेर गावी गेलेली होती. त्यामुळे ती बचावली आहे.

दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सारंग नवलकार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, हस्त मुद्रा तज्ज्ञ दाभाडी या गावात तळ ठोकून आहेत. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून, शेजारील जिल्ह्यातील काही गावांनाही अलर्ट करण्यात आले आहे.

Web Title: Doctor couple brutally beaten for resisting robbery incident in buldana nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 07:55 AM

Topics:  

  • Murder Case

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ
1

चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला
2

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले…
4

Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.