Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

रिक्षाचालक तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 12:30 AM
Murder Case News: "आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब..." सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!

Murder Case News: "आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब..." सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!

Follow Us
Follow Us:
  • पुण्याच्या भवानी पेठेतील काशेवाडीत रिक्षाचालक तरुणाची हत्या
  • जुन्या वादातून डोक्यात दगड घालून गंभीर मारहाण
  • अस्लम खान यांचा झोपेत मृत्यू; आरोपीचा शोध सुरू
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिक्षाचालक तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अस्लम युसूफ खान (वय ३०, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खान याचा मोठा भाऊ मुझ्झमील (वय ३३, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अस्लम हा रिक्षाचालक असून, तो गॅरेजमध्ये रिक्षा दुरस्तीचे कामे करायचा. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) त्याचा महापालिका काॅलनी क्रमांक दहा परिसरातील एका तरुणाशी वाद झाला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास तो काशेवाडी भागातून निघाला होता. चमनशहा दर्ग्याजवळ आरोपी तरुणाने अस्लम याला अडवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून तो पसार झाला.

जखमी अवस्थेतील अस्लम याला चक्कर आली. जखमी अवस्थेत तो घरी गेला. चक्कर आल्याने तो घरात झोपला. झोपेतच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी तो झाेपेतून जागा झाला नाही. त्याला कुटुंबीयांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. चौकशीत अस्लम याला एका तरुणाने मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

एकाच रात्री दोन गंभीर घटना

पिंपरीतील ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून ४.२० लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील दोघांचे आणखी एक गंभीर कृत्य उघडकीस आले आहे. व्यापाऱ्याला लुटण्याच्या काही वेळ आधीच या दोघांनी आपल्या एका साथीदारासह काळेवाडीत एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. जुन्या वादातून तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. त्यानंतर कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. एकाच रात्री घडलेल्या या दोन घटनांमुळे पिंपरी- चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात रिक्षाचालक तरुणाचा खून कुठे झाला?

    Ans: पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात चमनशहा दर्ग्याजवळ ही घटना घडली.

  • Que: खून झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: अस्लम युसूफ खान (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो रिक्षाचालक आणि गॅरेजमध्ये काम करत होता.

  • Que: अस्लम खान यांचा खून कशा प्रकारे करण्यात आला?

    Ans: जुन्या वादातून आरोपीने अस्लम यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत घरी गेलेल्या अस्लम यांचा झोपेत मृत्यू झाला. या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a rickshaw driver was murdered nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात
1

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
2

लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला
3

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना
4

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.