Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे रविवारी पहाटे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 02:46 PM
चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  •  पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली
  • पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने हे कृत्य केले
  • पसार आरोपीला मालेगाव शहरातून पोलिसांनी अटक केली
वाशिम : चारित्र्याच्या संशयातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे रविवारी पहाटे घडली आहे. शारदा दिनेश जोंधळे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, दिनेश जोंधळे (वय ३९) असे आरोपी पतीचे नाव आहे. हत्येनंतर पसार झालेल्या आरोपीला जऊळका पोलिसांनी मालेगाव शहरातून शोधून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश जोंधळे हा व्यसनाधीन असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी नेहमी वाद घालत होता. याच संशयातून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. दरम्यान, रविवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास दोघेही घरात झोपलेले असताना दिनेशने कुऱ्हाडीने पत्नी शारदा हिच्या मानेवर वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घरातून पसार झाला. या दाम्पत्याला २ विवाहित मुली आणि १५ वर्षांचा मुलगा आहे.

घटनेच्या रात्री मुलगा आणि मुलगी घरासमोर असलेल्या आजी-आजोबांच्या स्वतंत्र घरात झोपण्यासाठी गेले होते. सकाळी आई-वडील अद्याप उठले नसल्याने मुलगी त्यांना पाहण्यासाठी घरी गेली. दरवाजा उघडा असल्याने आत जाऊन पाहिले असता आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली, तर वडील घरातून गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर, हवालदार रतन बावस्कर तसेच पोलिस कर्मचारी अमोल पाटील, विनोद दामोदर आणि सलीम शेख यांनी तपासाची चक्रे फिरवून पसार आरोपीचा शोध घेतला. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार!

रिक्षाचालक तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अस्लम युसूफ खान (वय ३०, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खान याचा मोठा भाऊ मुझ्झमील (वय ३३, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा : वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: जऊळका येथे हत्या झालेल्या महिलेचे नाव काय आहे?

    Ans: शारदा दिनेश जोंधळे (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

  • Que: आरोपी पतीने पत्नीची हत्या का केली?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी दिनेश जोंधळे (वय ३९) तिच्याशी वारंवार वाद घालत होता. याच संशयातून त्याने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली.

  • Que: पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी कुठून अटक केली?

    Ans: पत्नीची हत्या केल्यानंतर पसार झालेल्या दिनेश जोंधळे याला जऊळका पोलिसांनी मालेगाव शहरातून शोधून अटक केली.

Web Title: An incident in which a husband murdered his wife has taken place in washim nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी
1

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ
3

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!
4

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.