Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali Crime: किरकोळ वादाचं भीषण शेवट! पतीने पत्नीचा घेतला जीव, तीन मुले पोरकी; डोंबिवली येथील घटना

डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. ज्योती धाहीजेचा खून करून पती पोपट धाहीजे फरार झाला. तीन अपत्यांसह कुटुंब उद्ध्वस्त; मानपाडा पोलिसांचा तपास सुरू

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 27, 2025 | 10:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात पत्नीची गळा दाबून हत्या
  • किरकोळ वादातून संतापून पतीने घेतला पत्नीचा जीव
  • आरोपी पतीचा शोध सुरु
डोंबिवली: डोंबिवली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या हत्येनंतर पती घटनास्थळावरून फरार झाला. किरकोळ कारणावरून संतापून पतीने हे कृत्य केले असल्याची माहिती आहे. मृत महिलेचे नाव ज्योती धाहीजे असे असून आरोपी पतीचे नाव आहे. ही घटना कोळेगाव परिसरात घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली येथील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी ही धक्कदायक घटना घडली. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती आणि पोपट धाहीजे हुए दाम्पत्य मूळचे जालना येथील रहिवासी आहे. कामानिमित्य ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी 3 अपत्ये आहेत. बुधवारी सकाळी ज्योती आणि पोपट यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झालं. याच भांडणाच्या रागात पोपट याने ज्योतीचा गळा दाबून हत्या केली.

वाळू तस्करीवर सरकारचा मोठा घाव! पुनरावृत्ती करणाऱ्यांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द

शेजाऱ्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचेल. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरवात केली. आरोपी पती पोपट धाहीजे हा हत्येनंतर घटनास्थळावरून फरार झाला. मानपाडा पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, पोलीस कसून शोध घेत आहे. पोपटने ज्योतीचा खून का केला याचे कारण पोपटला अटक केल्यानंतर समोर येणार आहे. पोलीसांनी मृत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड

डोंबिवली येथे खाडी जवळ सुटकेशमध्ये एका तरुणीचा सडलेला मृतदेह आढळला होता.ही घटना पलावा उड्डाणपुलाच्या खाली देसाई खाडी जवळ सोमवारी दुपारी जवळपास 1.45 वाजता समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. डायघर पोलिसांनी या प्रकरणाचा १२ तासात उलगडा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेला मृतदेह हा एका तरुणीचा आहे. या प्रकरणातील मृतक तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा असे आहे. तिची हत्या करणारा लिव्ह-इन पार्टनरनेच केल्याचे समोर आले आहे. हत्या करणाऱ्याचं नाव विनोद विश्वकर्मा असे आहे. मृतक प्रियंका आणि आरोपी विनोद हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि याच वादातून विनोदने संतापाच्या भरात प्रियांकाचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विनोदने तिचा मृतदेह एका मोठ्या सुटकेस बॅग मध्ये भरला. त्यानंतर सुटकेस देसाई खाडीजवळ आणून फेकून दिला.

Ahilyanagar Crime: शरद पवार गटाच्या नेत्यावर सत्तूर–तलवारीने हल्ला, 15 जणांचा गँग-अटॅक; प्रकृती चिंताजनक

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पत्नीची हत्या कशी झाली?

    Ans: पती पोपट धाहीजेने किरकोळ वादातून संतापून पत्नी ज्योतीचा गळा दाबून खून केला.

  • Que: आरोपी पती सध्या कुठे आहे?

    Ans: हत्या केल्यानंतर पोपट घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

  • Que: या घटनेत किती मुले पोरकी झाली?

    Ans: दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये असून त्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे.

Web Title: Dombivali crime husband took his wifes life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • crime
  • Dombivali
  • Dombivali Crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग
4

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.