डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई प्रवीण चौधरी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्राचार्यांसोबत चर्चा सुरू असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवलीमध्ये अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने रिक्षातून हॉस्पिटलकडे नेत असताना त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन लुटण्यात आली. विष्णूनगर पोलीस स्टेशनने आरोपीला आजदे गावातून अटक करून चैन हस्तगत केली.
डोंबिवली येथे नामांकित डॉक्टरने वैयक्तिक तणावातून 10 बिअर व 45 झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उपचार वेळेत मिळाले. विष्णूनगर पोलीस तपास करत आहेत.
राजकीय समीकरण, राजकीय घाडामोडी नाट्य पाहता या नाँट रिचेबल नगरसेवकांची भुमिका काय ? हे ते समोर आल्यानंतर नेमके कळेल पंरतु या बेपत्ता नगरसेवक प्रकरणी उबाठा गटाने नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी लेखी…
डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाने अचानक रस्ता बंद केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या रस्ता बंदीमुळे परिसरातील तब्बल ११५ कुटुंबांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विरार पूर्वच्या मानवेल पाडा या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असतानाही काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मोबाइलसह प्रवेश केल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असतानाच केडीएमसीतील मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे.
आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबर दरम्यान २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. आगरी समाजाच्या साहित्य, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक वैभवाचे दर्शन घडवणारा…
डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. ज्योती धाहीजेचा खून करून पती पोपट धाहीजे फरार झाला. तीन अपत्यांसह कुटुंब उद्ध्वस्त; मानपाडा पोलिसांचा तपास सुरू
डोंबिवलीत सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या हत्येचा १२ तासांत उलगडा झाला. प्रियंका विश्वकर्माची तिच्या लिव्ह-इन पार्टनर विनोद विश्वकर्माने किरकोळ वादातून गळा दाबून हत्या केली आणि पुरावा लपवण्यासाठी मृतदेह खाडीत फेकला.
डोंबिवलीच्या गोकुळधाम टॉवरमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला. सराईत गुन्हेगार रोशन झा अटक. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी सापडलेला शस्त्रसाठा सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील बारबाहेर किरकोळ धक्क्यावरून आकाश सिंगचा सहा जणांनी चाकूने भोसकून खून केला. मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपास करून अवघ्या 24 तासांत सर्व आरोपींना अटक केली.
मनसेच्या इशाऱ्यानंतर काल शनिवारी पालिका प्रशासनाने तगड्या पोलीस बंदोबस्तात स्टेशनजवळील पूर्वेकडील भागात प्रखर कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण केलेले फुटपाथ आणि अनधिकृत शेड्स जमीनदोस्त करण्यात आल्या.
डोंबिवलीमध्ये एका सुरक्षारक्षकाने मुलांचे हात बांधून मारहाण केली आणि इमारतीसमोर फिरवल्याची घटना घडली. या प्रकरणी पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षक राजेंद्र खंदारे विरोधात तक्रार दाखल केली आहे.
डोंबिवलीत पलावा सिटीत दोन मुलांना बॉलसाठी इमारतीत गेल्याने सुरक्षा रक्षकाने हात बांधून मारहाण केली. आरोपी राजेंद्र खंदारे पोलिसांच्या ताब्यात, परिसरात खळबळ उडाली.