Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali Crime: संतापजनक! सोशल मीडियावरून जाळ्यात ओढलं, अश्लील व्हिडीओ काढले आणि व्हायरल केले…

डोंबिवलीतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका हाय प्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून आरोपीने जाळ्यात ओढले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 31, 2025 | 11:04 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

डोंबिवलीतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका हाय प्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून आरोपीने जाळ्यात ओढले. तिचे अश्लील व्हिडीओ काढून हे व्हिडीओ वायरल केल्याचे समोर आले आहे.

Pune Crime News: पिंपरी चिंचवड हादरलं! प्रेयसीच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध, ११ जणांनी मिळून प्रियकराची केली हत्या

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी चिराग गावंडे आणि पीडित यांची ओळख मैत्रीतून झाली आणि नंतर ती मैत्री प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. त्यानंतर आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो काढले. एवढ्यावर न थांबता त्याने तिच्याकडून वारंवार अश्लील व्हिडिओची मागणी केली. व्हिडिओ न दिल्यास इंस्टाग्राम व स्नॅपचॅटवर फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. धमकीला घाबरून अल्पवयीन तरुणीने काही व्हिडीओ आरोपीला पाठवले आणि आरोपीने हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या प्रकरणानंतर कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ आई-वडिलांच्या मोबाईलवर पोहोचल्याने घरच्यांनी धाव घेत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मते, अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणि सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत असून तरुणींनी अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संवाद साधताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

धक्कदायक! आधी इंस्टाग्रामवर मैत्री नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने संपवले जीवन

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कदायक घटना घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर हीच ओळख प्रेमसंबंधात बदलली. त्यानंतर यात बालमेलींग सुरु झाली. अखेर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणीची ओळख आरोपी ऋतिक रोहने याच्याशी शाशल मीडियावर झाली. सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर ती प्रेमात बदलली. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याकडून दागिने घेतले. एवढेच नाही तर तिचे व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देण्यात आली. याच मानसिक दबावाला आणि सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने थेट व्हिडीओ कॉलदरम्यान गळफास घेऊन जीवन संपवले.

या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, आरोपी ऋतिक रोहनेने केवळ मृतक तरुणीलाच नव्हे तर इतर काही मुलींनाही अश्याच प्रकारे फसवल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरु केली आहे. कल्याण ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा तापास करत असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara Crime: आरोपीने पोलिसांवर केला कोयत्याने हल्ला, पोलिसांनी थेट एन्काऊंटरच केला; सातारा येथील प्रकार

Web Title: Dombivali crime outrageous caught in the net through social media obscene videos were made and made viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • crime
  • Dombivali Crime
  • dombivali news

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.