सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकार सामोर आला आहे. सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एंकॉउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. लखन भोसलेला जबरी चोरी प्रकरणात अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला चढवला. यात चार पोलीस गंभीर जखमी झाले आहे.
Crime News: ‘छाती, पोट आणि पाठीवर १० ते १२ वार’, पतीकडून धारदार हत्याराने पत्नीची निर्घृण हत्या
थेट एन्काऊंटर
हल्ला चढवल्यानंतर पोलिसांनी थेट त्याचा एन्काऊंटर केला. आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे.लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करुन फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना ही घटना घडली आहे.
धक्कदायक! उल्हासनगरच्या बाल सुधारगृहातून ६ मुली गेल्या पळून, २ मुली सापडल्या
उल्हासनगर मधून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. बालसुधार गृहातून ६ अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा पैकी दोन मुलींचा शोध पोलिसांनी घेतला आहे. तर चार मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. सापडलेल्या मुलींनी पोलिसांसोबत जबाब दिला आहे की, आम्हाला त्या ठिकाणी राहायचे नाही. त्यामुळे आम्ही पळून गेलो.या मुली पळून गेल्याने बालसुधारगृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
२७ ऑगस्टला बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास उल्हासनगर येथील शासकीय बालसुधार गृहात सहा अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर माहिती समोर आली की या मुलींनी मेन गेटची चावी कुठून तरी मिळवली. मेन गेट उघडून सहा मुली तिथून पळून गेल्या. या प्रकरणात उल्हासनगर हिल्लईं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहा मुली अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांनी याचा तपास सुरु केला.
उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींना शोधण्यासाठी पथके नेमली गेली. दोन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले. या दोन मुली त्यांच्या मिराभाईंदर येथील राहत्या घरी मिळून आल्या. याबाबत उल्हासनगरचे डीपीसी गोरे यांनी सांगितले की, या सहा पैकी काही मुली मिराभाईंदर, काही मुली ठाणे तर काही मुली मुंबईतील आहेत. घटनेच्या दिवशी या सहा पैकी काही मुली मेन गेटची चावी असलेल्या रुममध्ये गेल्या. तिथून त्यांनी चावी मिळवली.