Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच गणपती दर्शनावरून वाद झाला... संशयाच्या रागातून पतीने पत्नीवर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केला. महिला गंभीर जखमी, आरोपी पती अटकेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 22, 2026 | 07:20 PM
Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

Follow Us
Follow Us:
  • पत्नीवर चाकूने हल्ला
  • गणपती दर्शनावरून वाद
  • पती आरोपी अटकेत
 

डोंबिवली: घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू असतानाच पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील विष्णूनगर परिसरात घडली आहे. मित्र-मैत्रिणींसोबत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर तिच्या छातीवर चाकूने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पती संतोष पेटेकर याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

लग्नानंतर संशय घेत असल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये ज्योती यांचा संतोष पेटेकर यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर संतोष हा पत्नीवर संशय घेत असल्याचा आरोप आहे. या संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. पतीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून २०२० मध्ये ज्योती आपल्या चार मुलांसह पतीपासून वेगळ्या राहू लागल्या.

हेही वाचा: दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

घटस्फोटाची प्रक्रिया सुरू

वेगळं राहिल्यानंतर ज्योती स्वतः कष्ट करून चारही मुलांचा सांभाळ करत होत्या. दरम्यान, पती-पत्नीमधील वादामुळे दोघे अधिकृतरित्या विभक्त होणार होते. त्यासाठी न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू होती. मात्र, या काळातही आरोपीकडून पत्नीला त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मित्र-मैत्रिणींसोबत गणपती दर्शनासाठी गेल्याने वाद

दरम्यान, ज्योती या मित्र-मैत्रिणींसोबत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. याचा राग मनात धरून संतोष त्यांच्या राहत्या घरी गेला. ‘मित्रांसोबत फिरायला का गेलीस?’ असा जाब विचारत त्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर चाकूने तिच्या छातीवर वार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी दिली.

आईवर हल्ला झाल्याने मुले घाबरली

हल्ल्यानंतर ज्योती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. आईवर हल्ला होत असल्याचे पाहून चारही मुलांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आजी, मावशी, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपीने ज्योती यांच्या बहिणीलाही मारहाण केल्याची माहिती आहे. जखमी ज्योती यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संतोष पेटेकरला अटक केली. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Dombivli husband attacks wife with knife over ganpati darshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Attack
  • Crime . Crime News
  • Husband and wife

संबंधित बातम्या

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
1

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
2

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…
3

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
4

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.