Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: भाईंदरमध्ये वाढतंय गुंडांचं वर्चस्व , एका आरोपीला अटक, पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा

मीरा भाईंदरमध्ये मद्यधुंद तरुणांनी दारुच्या नशेत सोसायटीत गाडी घुसवली . या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत एक आरोपी अटक करण्यात आले असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2025 | 04:15 PM
Crime News:  भाईंदरमध्ये वाढतंय गुंडांचं वर्चस्व , एका आरोपीला अटक, पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते: मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी सकाळी काशीगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जेपी नॉर्थ बर्सिलोनी सोसायटीत एक घातक घटना घडली. काही गुंड मुलांनी सोसायटीतील गार्डला धक्काबुक्की करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गुंडांनी गाडीत बसलेल्या वॉचमनला अरेरावी केली आणि सुरक्षा रक्षकाला धमकावले, ज्यामुळे तीन जण जखमी झाले. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत एक आरोपी अटक करण्यात आले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

घटना कशी घडली?

मंगळवारी सकाळी, जेपी नॉर्थ बर्सिलोनी सोसायटीच्या गेटवर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. ड्युटीवर असलेल्या वॉचमनने, गाडीतील मुलांकडे फ्लॅट नंबर विचारला. या साध्या प्रश्नामुळे त्या मुलांचा राग वाढला, आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला धमकावले. या मुलांनी गार्डला देशी बंदुकीचा धाक दिला आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. “जिला गाझियाबाद दाखवू,” अशी धमकी देत त्यांनी स्कॉर्पिओ गाडी गार्डवर चढवली, ज्यामुळे तीन लोक जखमी झाले.

पोलिसांची तातडीची कारवाई

घटना घडल्या नंतर, काशीगाव पोलिसांना त्वरित माहिती मिळाली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 109 (सामाजिक शांतता भंग करणे) आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यावर, आरोपी कौस्तुभ भोईघडे याला अटक केली, आणि बाकी दोघांच्या ठिकाणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे आणि त्यावर पुढील तपास सुरू आहे.

आरोपींच्या गुन्ह्याचा मागोवा

पोलिसांनी सांगितले की, आरोपींवर आधीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांचा एक गोंधळ दहिसर परिसरात घडला होता, परंतु त्या वेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. काश्मीर, मालेगाव आणि आसपासच्या भागात त्यांनी आधीही दहशत माजवली आहे. त्यांचे काही साथीदार अजून फरार आहेत, ज्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांचा संदेश

पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले, “आशा प्रकारच्या गुंडगर्दीला आम्ही कधीही माफ करणार नाही. मीरा भाईंदर शहरात कायदा सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत ढासळू दिली जाणार नाही. अशा गुंडांना पोलिसांची कडक कारवाई आणि कायद्याचा धाक दाखवला जाईल.” गायकवाड यांनी नागरिकांना इशारा दिला की अशा घटनांना बळी पडल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.

शहरातील वातावरण

या घटनेनंतर शहरात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, पण पोलिसांनी तत्काळ कारवाई करून गुंडांना रोखले. अनेक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे, आणि यापुढे अशा घटनांमध्ये पोलिसांनी आणखी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

शहरातील नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, आणि पोलिसांनी सांगितले की मीरा भाईंदर मध्ये कोणत्याही गुंडगर्दीला थांबवण्यासाठी ते कायम सजग आणि कारवाईत सक्रिय राहतील.

Web Title: Dominance of gangsters is increasing in bhayander one accused arrested police warning of strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • crime
  • Mira Bhyander

संबंधित बातम्या

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
1

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार
2

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?
3

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप
4

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.