Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये हुंडाबळी, लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य; मृतदेहावर आढळेल अनेक जखमा अन्…

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. सासरचे मंडळी हुंड्यासाठी त्रास देत होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 10, 2025 | 01:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. सासरचे मंडळी हुंड्यासाठी त्रास देत होते. या त्रासामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. लग्नाला केवळ २ महिनेच झाले होते. दोन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही असं तिचा नवरा तिला म्हणत त्रास देत होता. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सोनाली बाळू वनवे (वय २२) असे आहे.

Ayush Komkar Murder Case: ‘मीच माझ्या नातवाचा खून का करेल? मला यात अडकवलं गेलयं ‘; बंडू आंदेकरने कोर्टात इतिहासच सांगितला

रक्कम दिल्यानंतर देखील त्रास
सोनालीचा दोन महिन्यांपूर्वी जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जेशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली. सोनालीच्या माहेरकडून ही रक्कम दिल्यानंतरही “मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही” असे कारण देत तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. सततचा छळ सहन होत नसल्याने सोनालीने आपली व्यथा आईला सांगितली होती, मात्र यात काहीही फरक पडला नाही.

अचानक बेपत्ता
३१ ऑगस्ट रोजी सोनाली अचानक बेपत्ता झाली. शोध घेतला असता घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये हळहळ पसरली असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासु प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा हुंडाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

९५% लग्नांमध्ये हुंडा घेतला जातो

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अनेक हुंडाबळीचे प्रकरण समोर आले. या हुंडाबळीच्या त्रासामुळे अनेक महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. हुंडा बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी हुंडा पद्धत अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, भारतात ९५% लग्नांमध्ये हुंडा घेतला जातो. हुंडा प्रथेमुळे महिलांविरुद्ध भावनिक अत्याचार, शारीरिक छळ आणि मृत्यू यांसारखे गंभीर गुन्हे घडतात. कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने हुंडा प्रथेविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. आता बीडच्या या प्रकरणात लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात एका २२ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हुंड्यासाठी सतत सासरच्या त्रासामुळे या तरुणीने देखील आपले जीवन संपवले संपवले. एवढेच नाही तर रक्कम दिल्यानंतर तिच्या नवऱ्याकडून “मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही” असे म्हणत त्रास देत असे. या सर्व कारणांना कंटाळून या तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Mumbai High Alert : अग्निवीर जवानाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक

Web Title: Dowry victim in beed newlywed ends life two months after marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात पडला उपसरपंच; थेट तिच्या घरासमोर जात केली आत्महत्या
1

कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात पडला उपसरपंच; थेट तिच्या घरासमोर जात केली आत्महत्या

Pune Crime : शाळकरी विद्यार्थिनीच्या वादातून गोळीबार, वडगाव मावळमधील प्रकार; तीन आरोपी अटकेत
2

Pune Crime : शाळकरी विद्यार्थिनीच्या वादातून गोळीबार, वडगाव मावळमधील प्रकार; तीन आरोपी अटकेत

Delhi Crime : मुंबई ते रांची…, १२ हून अधिक ठिकाणी छापे, ८ संशयित दहशतवाद्यांना अटक
3

Delhi Crime : मुंबई ते रांची…, १२ हून अधिक ठिकाणी छापे, ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

Mumbai High Alert : अग्निवीर जवानाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक
4

Mumbai High Alert : अग्निवीर जवानाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.