'मीच माझ्या नातवाचा खून का करेल? मला यात अडकवलं गेलयं..'; बंडू आंदेकर
पण, सरकारी वकिलांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी बंडू आंदेकरसह इतर आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सर्व सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. गणेश कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बंडू आंदेकरने न्यायलया आपली बाजू मांडली. “आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातयं. ज्यावेळी ही हत्या घडली, त्यावेळी आम्ही केरळला होतो. पोलिसांच्या विरोधात आमची कोणतीही तक्रार नाही, पण आम्हाला अडकवलं जात आहे.” असा दावा त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे, तपास अधिकाऱ्यांनीदेखील या प्रकरणाची महत्त्वाची माहिती न्यायालयात सादर केली.
आयुष कोमकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर यांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. ” गेल्या 10 तासांपासून आम्हाला अटक करण्यात आली आहे. जी FIR झाली तीदेखील चुकीची आहे. माझी मुलगी कल्याणी हिनेच याबाबतची फिर्याद दिली आहे. मरण पावलेला माझाच नातू आहे. मग आमची नावे का आली, गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्याद दिली होती. त्यावेळीही मी सांगितलं होतं की कल्याणीनेही कट रचला होता. तिच्या घरच्यांनाही अटक कऱण्यात आली आहे.
आयुष कोमकर माझा नातू होता. मग मी माझ्याच नातवाचा खून का करेल मला काय मिळणार आहे. आयुष माझा वैरी होता का, असा प्रश्नही बंडू आंदेकरांनी उपस्थित केला. तसेच मला मारायचंच असतं तर मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारेल, वनराजचे खूप चाहते खूप आहेत. त्यांपैकी कुणी मारलं असावं, असंही बंडू आंदेकरांनी यावेळी स्पष्ट केलं. “मी फिर्यादीच्या पतीचे, सासऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतल्यामुळे माझंही नाव यात गोवण्यात आलं. माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना तुरुंगात पाठवलं, म्हणून माझं संपूर्ण कुटुंब तुरुंगात पाठवायचं, हा यामागचा उद्देश आहे, असंही बंडू आंदेकरांनी न्यायालात सांगितलं.
“दत्ता काळे याने माझं नाव घेतलेले नसतानाही खोटा फिर्यादी बनवून आम्हाला यात ओढलं जात आहे. आमचे घरगुती वाद असल्यामुळे आमची नावे यात गोवली गेली आहेत. आम्ही राज्यात नव्हतो, आम्ही केरळमध्ये होतो. त्यामुळे कट रचण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्याकडून पिस्तूल जप्त कसं करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, “वृंदावनी आंदेकर यांना सूर्यास्तानंतर अटक करण्यात आली असून, त्यावेळी कोणतीही महिला पोलिस अधिकारी उपस्थित नव्हती. ही अटक नियमबाह्य आहे,” अशी तक्रारही केली.






