
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
वसई : वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरी उघडकीस आणली होती. आता या प्रकरणानंतर पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेश कौशिक यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी चौकशीत या फॅक्टरीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र ठाण्याच्या इतक्या जवळ अवैध ड्रग्स निर्मिती सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
हजेरी देण्याचे आदेश
तसेच निलंबन काळात वनकोटी यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष येथे हजेरी देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईमुळे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
छाप्यात १४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई पोलिसांच्या झोन 6 अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकताच पेल्हार पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर सुरू असलेल्या ड्रग्स फॅक्टरीवर छापा टाकला होता. या कारवाईत ६ किलो ६७५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल असा सुमारे १४ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
प्रथितयश वकिलाला मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करून तरुणीने उकळले दीड कोटी; घरात एकटा असताना
मुंबई: मुंबईतुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने प्रथितयश वकिलाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. त्याचे मॉर्फ केलेले काही फोटो दाखवून या वकिलाला धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिने वकिलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे देखील प्रयत्न केले. वकिलाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
प्राथमिक माहितीनुसार, पीडित वकील आणि आरोपी तरुणीची ओळख मित्रांमार्फत झाली होती. गेल्यावर्षी ही तरुणी वकिलाच्या मित्रांसोबत त्याच्या घरी देखील गेली होती. त्यानंतर हे दोघे इन्स्टाग्रामवरुन एकमेकांशी चॅटिंग करू लागले. काही काळानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलायला सुरुवात केली. नंतर दोघेही अधूनमधून भेटायला लागले होते. दोघांमधील मैत्री घट्ट झाल्यानंतर या तरुणीने वेगवेगळी कारणे सांगून वकिलांकडून पैसे मागायला सुरुवात केली. बरच्याचवेळा त्याने तिला पैसे दिले. ही रक्कम जवळपास २० ते 30 लाखांच्या घरात होती. त्यानंतर वकिलाने पैसे परत मागितले तेव्हा तरुणीने नकार दिला. एवढेच नाही तर दोघांच्या भेटीवेळचे खासगी फोटो मॉर्फ करुन ते व्हायरल करण्याची आणि बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली.
आरोपी तरुणीने पीडित वकिलाच्या घरी येऊन त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तेव्हा वकिलाने, मी विवाहित आहे, मला लहान मुलगी आहे, असेही या तरुणाला सांगितले. तरीही ही तरुणी वकिलाशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत राहिली. तसेच तू माझ्यासोबत फिरायला चल, असा हट्टही या तरुणीने धरला होता. त्यानंतर तरुणीने या वकिलाला ब्लॅकमेल करुन जवळपास दीड कोटी रुपये उकळले. गोरेगाव पोलीस ठाण्यात या तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.