Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जाच्या वाढीव व्याजाची मागणी केल्याने कर्जदाराची आत्महत्या , एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत कठोर शिक्षेची केली विनंती

कर्जदार रवींद्र शिंदे यांनी सांताक्रुज मधील प्रथमेश चव्हाण यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे व्याज शिंदे हे फेडत असताना चव्हाण यांनी अधिक दराची मागणी केली, व त्रास द्यायला सुरुवात केली. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2025 | 05:16 PM
कर्जाच्या वाढीव व्याजाची मागणी केल्याने कर्जदाराची आत्महत्या

कर्जाच्या वाढीव व्याजाची मागणी केल्याने कर्जदाराची आत्महत्या

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य, नवी मुंबई: कोपरखैरणेतील कर्जदार रवींद्र शिंदे यांनी सांताक्रुज मधील प्रथमेश चव्हाण यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे व्याज शिंदे हे फेडत असताना चव्हाण यांनी अधिक दराची मागणी केली, व त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून रवींद्र शिंदे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे परिसरात घडली आहे. यावेळी शिंदे यांनी सुसाईड नोट लिहित त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ प्रथमेश चव्हाण याला कठोर शिक्षा व्हावी याबाबत विनंती केली आहे.

 पुन्हा एक हुंडाबळी! अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून गळफास

रवींद्र मोहन शिंदे, वय 39 वर्ष, हे कोपरखैरणेतील सेक्टर 19 मधील, श्रीनाथ आपारमेंट मध्ये राहतात. रवींद्र शिंदे यांनी प्रथमेश चव्हाण, वय 30 वर्ष, राहणार वाकोला ब्रिज जवळ, सांताक्रुज, यांच्याकडून कर्ज घेतले होते. रवींद्र शिंदे हे त्या कर्जाच 12.5 टक्क्यांनी व्याज भरत होते. तरीदेखील प्रथमेश चव्हाण यांनी 30 टक्के व्याजाची मागणी रवींद्र यांच्या जवळ केल, व त्यानुसार व्याजाची रक्कम भरण्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. चव्हाण यांच्या वाढत्या त्रासाला कंटाळून रवींद्र शिंदे यांनी घराच्या टेरेसवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून, माझ्या मरणाचा जबाबदार प्रथमेश चव्हाण असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ प्रथमेश चव्हाण याला कठोर शिक्षेची विनंती देखील केली आहे.

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये २१,२१९ शेतकऱ्यांची आत्महत्या

तर दुसरीकडे गेल्या २४ वर्षांत महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये २१,२१९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अमरावती महसूल विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये ही सर्व प्रकरणे समोर आली आहेत. जानेवारी २००१ ते जानेवारी २०२५ दरम्यान, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील २१,२१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ८० आत्महत्या या वर्षी जानेवारीमधील आहेत.

अहवालात म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत जिथे ६,२११ शेतकऱ्यांनी आपले जीवन दिले. दुसऱ्या क्रमांकावर अमरावतीमध्ये ५,३९५ आत्महत्या झाल्या आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये या जिल्ह्यांमध्ये मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी देखील अहवालात देण्यात आली आहे, ज्यामध्ये अमरावतीमध्ये १०, अकोलामध्ये १०, यवतमाळमध्ये ३४, बुलढाणामध्ये १० आणि वाशीममध्ये ७ प्रकरणे समाविष्ट आहेत. अहवालानुसार, त्यापैकी फक्त ९,९७० जणांना सरकारकडून भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे आढळले तर १०,९६३ प्रकरणे भरपाईसाठी अपात्र मानली गेली. ३१९ प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. प्रत्यक्षात, ज्या आत्महत्यांमध्ये कर्ज फेडण्यास असमर्थता किंवा पीक नुकसानीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले आहे, त्यांनाच भरपाई मिळण्यास पात्र मानले जाते.

कर्जाच्या वाढीव व्याजाची मागणी केल्याने कर्जदाराची आत्महत्या , एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत कठोर शिक्षेची केली विनंती

Web Title: Due to the demand for increased interest on the loan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी
1

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत
2

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
3

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू
4

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.