Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डंपरची दुचाकीला जोरदार धडक; मुस्ती येथील तीन मजुरांचा जागीच मृत्यू

मुस्ती येथील तिघे जण दुचाकीवरून धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) या गावाकडे मजुरीचे काम करण्यासाठी म्हणून जात होते. तर धोत्रीकडून मुस्ती गावाकडे माती भरण्यासाठी भरधाव वेगात डंपर जात होता. तेव्हा हा अपघात झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2025 | 01:41 PM
डंपरच्या धडकेत मुस्ती येथील तीन मजुर ठार

डंपरच्या धडकेत मुस्ती येथील तीन मजुर ठार

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.24) सकाळी साडेनऊच्या सुमारास मुस्ती-धोत्री रस्त्यावरील पाझर तलावाजवळील वळणावर झाला. या अपघातात एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावावर एकच शोककळा पसरली आहे.

देविदास मारुती दुपारगुडे (वय ३२), नितीन शाम वाघमारे (वय ३५), हनुमंता गोपीनाथ पवार (वय ४०, रा. तिघेही मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या तिघा मजुरांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मुस्ती येथील तिघे जण दुचाकीवरून धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) या गावाकडे मजुरीचे काम करण्यासाठी म्हणून जात होते. तर धोत्रीकडून मुस्ती गावाकडे माती भरण्यासाठी भरधाव वेगात डंपर जात होता. सदरचे वाहन हे मुस्ती पाझर तलाव क्रमांक एकजवळील वळणावर आले.

त्यानंतर डंपरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात तिघेही दुचाकीवरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. तिघांच्याही डोक्याला व सर्वांगास गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच डंपरच्या चालकाने डंपर न थांबवता तसाच निघून गेला. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने नुसती गावावर शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

दुसऱ्या एका घटनेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. शहरातील सिल्लोड रोडवरील मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कार भरधाव वेगात असल्याने आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title: Dumper hits bike hard and 3 people died incident in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Accident Case
  • Solapur News

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास
1

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी
2

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…
3

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात
4

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.