Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नराधम दत्ता गाडेचे धक्कादायक कारनामे समोर; अत्याचार केल्यानंतरही अर्धा तास…

गाडेच्या घराची देखील पोलिसांनी तपासणी केली. शुक्रवारी सकाळपासून पाच अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक त्याला घेऊन तपास करत होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2025 | 12:01 PM
नराधम दत्ता गाडेचे धक्कादायक कारनामे समोर; अत्याचार केल्यानंतरही अर्धा तास...

नराधम दत्ता गाडेचे धक्कादायक कारनामे समोर; अत्याचार केल्यानंतरही अर्धा तास...

Follow Us
Follow Us:

पुणे : स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेला घेऊन पोलिसांचे पथक पुन्हा त्याच्या ‘गुनाट’ गावात पोहचले आहे. तीन दिवसांच्या फरार काळात तो गावातील शेतात लपला होता. त्याने त्याचा मोबाईलही याच परिसरात लपविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी त्याला घेऊन तो लपलेल्या ठिकाणाची पाहणी केली. फरार कालावधीत ज्यांनी गाडेला मदत केली तसेच ज्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी तो गेला अशा जवळपास ७ लोकांचे स्टेटमेंट पोलिसांनी घेतले. गाडेच्या घराची देखील पोलिसांनी तपासणी केली. शुक्रवारी सकाळपासून पाच अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक त्याला घेऊन तपास करत होते.

स्वारगेट बसस्थानकात दहा दिवसांपूर्वी (दि. २५ फेब्रुवारी) पहाटे बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या प्रकरणात दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याला अटक केली. तो १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. तीन दिवसांपुर्वीच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांचे पथक तपास करीत आहे.

शुक्रवारी सकाळीच पाच अधिकारी, पंच आणि ३० कर्मचार्‍यांचे पथक गाडेला घेऊन गुणाट या गावी पोहचले. पोलिसांनी अटक केली असली तरी गाडेचा मोबाईल मिळू शकलेला नाही. प्राथमिक तपासात हा फोन गाडेने गुनाट गावातील शेतात लपवल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने पोलिसांच्या पथकाने गाडेला घेऊन तो लपलेल्या सर्वच ठिकाणाची पाहणी करण्यास सुरूवात केली. या भागात मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना सायंकाळपर्यंत मोबाईल मिळाला नाही. मोबाईलमधून आणखी काही धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, फरार असताना ज्या लोकांनी गाडेची मदत केली तसेच त्याने ज्या लोकांकडे मदत मागितली अशा ७ लोकांचे पोलिसांनी स्टेटमेंट घेतले आहेत. गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.

पडक्या घरात वास्तव्य

गुन्ह्यानंतर आरोपी गाडे त्याच्या गुनाट गावी गेला. पोलीस मागावर असल्याचे समजताच तो पसार झाला. गावातील शेतामध्ये तो लपून बसला होता. या कालावधीत त्याने पडक्या घरात वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्याही ठिकाणी पोलिसांनी शोध मोहिम राबविली.

अत्याचारानंतर नराधम अर्धा तास स्वारगेटमध्ये घुटमळत होता

अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतरही दत्तात्रय गाडे अर्धा तास स्वारगेट बसस्थानक व परिसरातच घुटमळत होता, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात आरोपी परिसरात फिरताना स्पष्टपणे दिसून आले आहे. एवढेच नव्हे, तर तो गुन्हा केल्यानंतरही निर्धास्तपणे परिसरात फिरत होता. या घटनेवरून आरोपीला कुठलाही भीतीभाव नव्हता, असे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी शेवटी स्वारगेट परिसरातून एका तरकारीच्या गाडीतून सोलापूर रस्त्याने निघून गेला. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीचा नेमका उद्देश काय होता? तो परिसरातच का थांबला होता? कोणी त्याला मदत केली का? या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.

Web Title: Dutta gades shocking exploits in the swargate case have come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • Datta Gade
  • maharashtra
  • Pune Police
  • Swargate Case

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
4

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.