Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…

Crime News: ही कारवाई पहाटे सुमारे पाच वाजल्यापासून सुरू असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. मात्र, कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास ईडीकडून नकार देण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 23, 2025 | 08:21 PM
मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार...

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार...

Follow Us
Close
Follow Us:
सातारा जिल्ह्यात ईडीची छापेमारी
एकाच वेळेस 5 ठिकाणी छापे
महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात

कराड: 

फलटण (जि. सातारा) येथील यशवंत बँकेतील कथित ११२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मोठी कारवाई करत फलटण व कराड शहरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
ईडीने यशवंत बँकेची कराड येथील शाखा, तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कराड येथील निवासस्थानासह विंग परिसरातील फार्महाऊसवर छापा टाकला. याशिवाय गजानन हौसिंग सोसायटी, सोमवार पेठ व वाखाण परिसरातही तपास करण्यात आला. ही कारवाई पहाटे सुमारे पाच वाजल्यापासून सुरू असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. मात्र, कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास ईडीकडून नकार देण्यात आला.
याबाबतची माहिती अशी की, यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी ही फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि ईडी संयुक्तपणे करत असून, यापैकी २२ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
फिर्यादीनुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत बँकेच्या व्यवहारांचे वैधानिक लेखापरीक्षण करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये बोगस कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप, तारण न घेता कर्ज मंजुरी, निधीचा गैरवापर, तसेच जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून निधी अन्य व्यक्तींकडे वळवण्यात आल्याचे आरोप नमूद आहेत. याच अनुषंगाने ईडीकडून कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे.
या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असून, एकाला फलटण येथे नेऊन तपास करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजप नेते व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर सध्या बाहेरगावी असून, कारवाईची माहिती मिळताच आपण कराडकडे येत असल्याचे त्यांनी कळविल्याची चर्चा आहे. ईडीकडून त्यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह दोन जणांकडून माहिती घेण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत ईडीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ईडीची ही कारवाई सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ed raid on yashwant bank shekhar chargaonkar 112 crore money laundering casr karad phaltan crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 08:19 PM

Topics:  

  • crime news
  • Enforcement Directorate
  • Money Laundering

संबंधित बातम्या

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; सूर्यकांत येवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
1

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; सूर्यकांत येवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Bandu Andekar Arrest : बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक; नेमकं प्रकरण काय?
2

Bandu Andekar Arrest : बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक; नेमकं प्रकरण काय?

पैशांसाठी काय पण! भीक मागणाऱ्या वृद्ध पित्याला मारहाण; मुलाने लाकडी दांडका उचलला अन्…
3

पैशांसाठी काय पण! भीक मागणाऱ्या वृद्ध पित्याला मारहाण; मुलाने लाकडी दांडका उचलला अन्…

पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?
4

पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.