
बोगस पदवीच्या आधारे 8 वर्षे नोकरी; पडताळणीही केली, फसवणूक झाल्याचे आढळताच...
नाशिक : बनावट पदवी प्रमाणपत्राच्या मदतीने नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी) येथे नोकरी मिळवलेल्या एका परप्रांतीयाचा कारनामा उघडकीस आला आहे. मागील आठ वर्षांपासून तो कनिष्ठ कार्यालय सहाय्यक म्हणून काम करत होता, हे विशेष ! बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या आरोपीविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक कुमार रामपाल सिंग (रा. चौधरान, सिसौली, जि. मुज्जफरनगर, उत्तरप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या उपप्रबंधक शिवांगी चंद्रा (वय २८, रा. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. चंद्रा यांच्या फिर्यादीनुसार, ३१ मार्च २०१८ रोजी नोटप्रेसमध्ये संशयित दीपक कुमार हा कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदावर रुजू झाला होता. सदरील नोकरी मिळवताना संशयिताने शैक्षणिक कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांची पडताळणी संस्थेकडून करण्यात आली.
हेदेखील : Bihar Crime: थरकाप उडवणारी घटना ! नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत
दरम्यान, संशयिताने गुजरातमधील साबरमती विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरात येथून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्याअनुषंगाने संस्थेने या शैक्षणिक कागदपत्रे विद्यापीठाकडे पडताळणीसाठी जुलै २०२५ मध्ये पाठविले.
आतापर्यंत तीन प्रकार उघड
बनावट कागदपत्रांच्य आधारे आरोपीने भारत प्रतिभूती मुद्रणालयाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने संशयिताविरोधात नाशिकरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संशयित दीपक कुमार पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आतापर्यंत अशा प्रकारचे तीन प्रकार समोर आले असून, यापूर्वी एका संशयितास अटक सुद्धा करण्यात आली होती. त्याचा अहवाल गेल्या २८ ऑगस्ट २०२५ रोजी कार्यालयास प्राप्त झाला.
शैक्षणिक कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न
कला शाखेचे पदवीचे शैक्षणिक कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल कार्यालयास मिळाला. मिळालेल्या अहवालानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यात समाधानकारक उत्तर संशयित दीपक कुमार याने दिली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला.
हेदेखील : Nashik Crime News : खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड